बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद सुरु झाला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली. तर काही कलाकारांनी त्यांच्यासोबत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये घडलेले किस्से सांगितले आहे. नुकताच ‘छिछोरे’ चित्रपटात काम करणारा अभिनेता वरुण शर्माचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याला करिअरच्या सुरुवातीला हीरोचा मित्र सांगून बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून साइन करण्यात आल्याचे तिने सांगितले आहे.
सध्या सोशल मीडियावर वरुणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने करिअरच्या सुरुवातीचा अनुभव सांगितला आहे. ‘कॉन्ट्रॅक्ट एका पुस्तका एवढा असतो बरोबर ना, खूप पाने असतात त्यामध्ये. पहिले अक्षरे असतात आणि शेवटी सही करण्यासाठी जागा. चार ओळींचा कॉन्ट्रॅक्ट कसा असू शकतो?’ असे वरुणने म्हटले आहे.
@aniljaiswal1007Well said##bollywoodboycut ##foryoupage ##foryou ##wemissyousushantsir ##varunsharma ##bollywoodreveal original sound – aniljaiswal1007
‘त्यांनी मला सांगितले होते हा कॉन्ट्रॅक्ट आहे, यावर सही कर. आणि त्यावेळी मला इतकी माहिती नव्हती. आता मला कॉन्ट्रॅक्ट कसा असतो हे माहित आहे. मी सही केली. आम्हाला ट्रेनने शुटींग होणार असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. मला सेटवर गेल्यावर कळाले की मी हीरोच्या मित्राचा नाही तर एक बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून काम करायचे आहे’ असे वरुण पुढे म्हणाला.
‘ही गोष्ट त्यांनी मला सांगितली नव्हती. मेन लोकं उभे होते त्यांच्या पाठीमागे मी चालत होतो. मी एक अनुभव म्हणून ते केले. त्यानंतर एक दिवस जेवणाचे डब्बे आले. त्यांनी आम्हाला रंगाच्या डब्यामध्ये जेवण दिले होते. रंगाच्या डब्यावर बाहेरुन ब्रँडचे नाव दिसत होते. आतुन फॉइल पेपर लावण्यात आला होता आणि बाहेरुन रंगाचा डब्बा तसाच होता’ असे पुढे वरुण म्हणाला आहे.
ही घटना वरुणसोबत २०११-१२मध्ये घडली होती. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.