News Flash

हा लोकप्रिय अभिनेता ठरला सर्वांत आकर्षक पुरूष

हा अभिनेता दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार आहे

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कोण? असा प्रश्न विचारल्यावर पटकन रजनीकांत, कमल हासन, प्रभास आणि रामचरण या कालाकारांची नावं येतात. या नावांमध्येच आताच्या तरुणींच्या गळ्यात ताईत ठरत असलेल्या विजय देवरकोंडा याचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अर्जुन रेड्डी या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. केवळ इतकंच नाही तर त्याने ‘मोस्ट डिझायरेबल मॅन’ (सर्वात आकर्षक पुरुष) होण्याचा बहुमानही पटकावला आहे.

‘हैदराबाद टाइम्स’च्या ‘मोस्ट डिझायरेबल  मॅन २०१९’साठी त्याची निवड झाली असून या यादीत त्याने प्रथम स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे विजयला गेल्या वर्षीदेखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तम अभिनयामुळे चर्चेत राहणारा विजय त्याच्या हटके स्टाइलस्टेटमेंटसाठीही ओळखला जातो. ट्रेंडी स्टाइल, अॅटीट्युड आणि राऊडी लूकमुळे त्याची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते.

 

View this post on Instagram

 

I feel loved. And, I love you all right back Note – This is just an appetizer. Massive delicious things ahead for us this year

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda) on

‘अर्जुन रेड्डी’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉमरेड’ या चित्रपटांनंतर त्याच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. सतत तो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत गेला त्यामुळेच त्याची पुन्हा एकदा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

“मी कोणी खास व्यक्ती नाही. माझ्या चाहत्यांप्रमाणेच त्यांच्यातलाच मी एक आहे. एक सामान्य माणूस आहे. पण जेव्हा माझे चाहते माझ्यावर प्रेम करतायेत याची जाणीव होते तेव्हा फार छान वाटतं”,असं विजयने हैदराबाद टाइम्सशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, विजय लवकरच  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्री अनन्या पांडेसोबत तो स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र या चित्रपटाविषयीची अद्यापतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 12:12 pm

Web Title: vijay deverakonda turns most desirable man ssj 93
Next Stories
1 मुलांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी संगीतकाराने स्वत:ला केले काचेच्या पेटीत बंद
2 Coronavirus : घरी बसून कंटाळलात? आता ओटीटी प्लॅटफॉर्म देतोय फ्री सबस्क्रिप्शन
3 गुरुनाथला महागात पडणार ‘माया’जाल; राधिका-शनायाने आखला नवा डाव
Just Now!
X