26 February 2021

News Flash

…म्हणून प्रिया वारियर मोबाइल वापरत नाही

प्रिया ही एक सर्वसामान्य मुलगी आहे

प्रिया वारियर

‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यातून अवघ्या काही सेकंदांसाठी झळकलेली, आपल्या प्रियकराला नजरेच्या एकाच बाणाने घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सोशल मीडियावर भलतीच लोकप्रिय झाली आहे. ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील एका गाण्याने प्रियाला रातोरात यशाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. तिचं भुवया उंचावणं आणि हळूच हसणं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेलं. अशी ही प्रिया इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही बाजी मारून गेली. अचानकच प्रकाशझोतात आलेली ही मल्याळम अभिनेत्री सध्याच्या घडीला कलाविश्वात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असली तरीही तिच्याविषयीची एक अतिशय महत्त्वाची गोष्टी फार कमी जणांना ठाऊक असावी. प्रियाच्या वडिलांनीच ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना तिच्याविषयीच्या या गोष्टीचा उलगडा केला.

प्रकाश वारियर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी म्हणजे प्रिया, मोबाइल वापरत नाही. तिला तशी परवानगीच नाही. हल्लीच्या तरुणाइसाठी मोबाइल हे अतिसामान्य उपकरण झालं असलं तरीही, प्रियाकडे असणाऱ्या मोबाइलमध्ये मात्र साधं सिम कार्डही नाही. त्यामुळे फोन करण्यासाठी आणि इतरांशी संवाद साधण्यासाठी तिला आईच्याच फोनवर अवलंबून रहावं लागत असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली.

आता तुम्ही म्हणाल सोशल मीडियावर तर ती बऱ्यापैकी सक्रिय आहे, मग मोबाइल वापरत नाही हे कसं शक्य आहे? याचा उलगडा तिच्या वडिलांनीच केला आहे. प्रियाकडे असणाऱ्या फोनमध्ये ती हॉटस्पॉट सुरु असतानाच इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या सेवांचा वापर करु शकते, असं त्यांनी सांगितलं.

प्रियाच्या गाण्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळच्या एका प्रसंगाविषयीसुद्धा प्रकाश वारियर यांनी सांगितलं. ‘प्रियाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा माझ्या एका सहकाऱ्यानेच तो मला पाठवला. तो व्हिडिओ पाहून ही माझीच मुलगी आहे, हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो नि:शब्दच झाला’, असं ते म्हणाले. प्रिया ही एक सर्वसामान्य पण, प्रचंड महत्त्वाकांक्षी मुलगी असून तिचं संगोपनही तसच झालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा : ‘व्हायरल’ची गंभीर साथ!

सोशल मीडियावर कमालीची प्रसिद्ध असणारी प्रिया या माध्यमातून आता घसघशीत कमाइही करु लागली होती. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्राम प्रोफाइलच्या माध्यमातून काही ब्रँडचं प्रमोशनही केल्यानंतर आता यापुढे ती ब्रँडचं प्रमोशनही करणार नसल्याची माहिती ‘उरु अदार लव्ह’च्या दिग्दर्शकांच्या पब्लिसिटी मॅनेजरने दिली.

मोबाइल न वापरणारी प्रिया अनेकांसाठी नवीन असून, सध्या तिच्या वडिलांनी केलेल्या या उलगड्यामुळे बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. पण, करिअरच्या दृष्टीनेच हे निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच प्रकाशझोतात आलेल्या प्रियाला बॉलिवूड चित्रपटाचीही ऑफर मिळाल्याचं म्हटलं जात आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटातून ती अभिनेता रणवीर सिंगसोबत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. पण, याविषयीची अधिकृत माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 11:59 am

Web Title: viral song manikya malaraya poovi fame malayalam actress priya prakash varrier is not allowed to use a cellphone
Next Stories
1 हर्षवर्धन कपूरच्या नखऱ्यांनी सगळेच त्रस्त
2 सलमानमुळे चित्रपटसृष्टीत आलेल्या ‘या’ अभिनेत्याला राधिकाने दिला मोलाचा सल्ला
3 ५० व्या दिवशीही वैभवशाली ‘पद्मावत’चीच जादू
Just Now!
X