News Flash

अनुष्कासाठी विराटने गायले रोमँटिक गाणे, व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची जोडी ही बेस्ट जोडी आहे. विराट आणि अनुष्का यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होताना दिसतात. अनुष्कासाठी गाणं गात असलेला विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड  व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये विराट लग्नानंतरच्या एका पार्टीत अनुष्कासाठी ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ गाणं गात आहे. उपस्थित असलेले सगळे पाहुणे हे विराटच्या या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने कॅमेरा शेवटी अनुष्कावर पॅन केल्याचे दिसत आहे. त्यात अनुष्का भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अनुष्का आणि विराट यांनी बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या अफवा या नेहमीच सुरू असायच्या. मात्र, अनुष्का आणि विराट यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्न करुण या अफवांना पूर्णविराम दिला. अनुष्का आणि विराटने कुटुंब आणि जवळच्या मित्रपरिवारांच्या उपस्थितीत लग्न केले.

दरम्यान, जानेवारी महिन्यात अनुष्काने वामिकाला जन्म दिला. या दोघांनी त्यांच्या मुलीचा चेहरा मीडियाला अजूनही दाखवलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 7:04 pm

Web Title: virat kohli singing mere mehboob qayamat hogi for anushka sharma in this throwback video went viral dcp 98
Next Stories
1 ‘त्याने माझा वापर केला आणि सोडून दिलं’, शिल्पा शेट्टीने केला होता खुलासा
2 राजीव कपूर यांच्या संपत्तीसाठी बहिण रीमा आणि भाऊ रणधीर पोहोचले कोर्टात
3 करोना संटकात बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण मदतीला धावला
Just Now!
X