News Flash

अनुष्काच्या ‘बुलबुल’ सीरिजवर हिंदुस्तानी भाऊचा आरोप; म्हणाला…

अनुष्काच्या सीरिजमध्ये केलाय हिंदु देवतांचा अपमान; हिंदुस्तानी भाऊचा आरोप

कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्माने अभिनयानंतर तिचा मोर्चा आता निर्मिती क्षेत्राकडे वळविला आहे. अलिकडेच तिची ‘बुलबुल’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. मात्र या सीरिजमधून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊने केला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून या सीरिजवर आक्षेप घेत काही आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अनुष्काची बुलबुल ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी आणि राहुल बोस यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र या सीरिजमध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊने केला आहे.

“अनुष्का शर्माच्या बुलबुल या सीरिजमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे अशा लोकांवर सरकार कारवाई करणार का? अजूनपर्यंत एकता कपूरवर कोणतीही कारवाई का करण्यात आलेली नाही?. कधीपर्यंत ही अशी लोकं आपल्या देशाचा अपमान करत राहतील?”, असं ट्विट हिंदुस्तानी भाऊने केलं आहे. सोबतच त्याने मुख्यमंत्र्यांनाही टॅग केलं आहे.

दरम्यान, हिंदुस्तानी भाऊ कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून न पटणाऱ्या गोष्टींवर थेट व्यक्त होत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने ऑल्ट बालाजीच्या एक्सएक्सएक्स या सीरिजमध्ये भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर त्याने एकता विरोधात तक्रारही दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 10:29 am

Web Title: web series anushka sharma bulbul accused of hurting religious sentiment hindustani bhau tweeted ssj 93
टॅग : Anushka Sharma
Next Stories
1 एकेकाळी कामाच्या शोधात असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने लॉकडाउनमध्ये साइन केले तीन चित्रपट
2 …म्हणून शाहरुखने नाकारली होती ‘स्लमडॉग मिलेनियर’ची ऑफर
3 विठ्ठल भक्तीत दंग करायला लावणारी १५ भक्तिगीते
Just Now!
X