05 July 2020

News Flash

हृतिककडून सोनमला टँगोचे धडे

'आशिकी' चित्रपटातील 'धिरे धिरे से...' गाण्याच्या रिमेकसाठी सध्या हृतिक रोशन आणि सोनम कपूर चर्चेत आहेत.

| August 28, 2015 04:26 am

‘आशिकी’ चित्रपटातील ‘धिरे धिरे से…’ गाण्याच्या रिमेकसाठी सध्या हृतिक रोशन आणि सोनम कपूर चर्चेत आहेत. गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान दोघांनीही खूप धमलामस्ती केल्याचे, तसेच दोघांचे एकमेकांशी चांगले सूर जुळत असल्याचे ऐकीवात आहे. आपल्या बडबड्या स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनमने हृतिकबरोबरचा नृत्यानुभव खूप छान असल्याचे शेअर केले आहे. शुटिंग संपल्यावर एक दिवस हृतिकने अचानकपणे सोनमसोबत नृत्य करण्यास सुरुवात करून तिला आश्चर्यचकीत केले. दोघे टँगो प्रकारातील नृत्य सादर करत असताना उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2015 4:26 am

Web Title: when hrithik roshan taught sonam kapoor to tango
Next Stories
1 जीवनप्रवासावरील पुस्तकासाठी महेश भटकडून अनु अग्रवालचे कौतुक
2 सलमानने ‘हिरो’ मधील ‘तो’ सीन हटवला
3 संजय दत्तचे मुलगी त्रिशालाबरोबर व्हिडिओ चॅट
Just Now!
X