News Flash

..म्हणून ‘संजू’चं यश साजरा करण्यासाठी संजय दत्त आलाच नाही

आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विक्की कौशल यांची विशेष उपस्थिती होती.

'संजू'

अभिनेता संजय दत्त याच्या वादग्रस्त आयुष्यावर प्रदर्शित झालेला ‘संजू’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळालं. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांचा ओघ वाढत असून कमी कालावधीमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या या यशानंतर ‘संजू’च्या टीमने सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये चित्रपटातील जवळपास सर्वच कलाकार उपस्थित होते. मात्र या साऱ्यांमध्येच संजय दत्त उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालं.

‘संजू’मुळे संजयच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आणि या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा झाला. त्यामुळे संजयच्या जीवनाबद्दल उत्सुकता निर्माण झालेले प्रेक्षक हा चित्रपट आवर्जुन पाहात आहेत. ‘संजू’ प्रदर्शित झाल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विक्की कौशल यांची विशेष उपस्थिती होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा संजय देशात नव्हता. तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर सिंगापूरमध्ये सुट्ट्या ऍन्जॉय करत आहेत. त्यामुळे संजयला या पार्टीमध्ये उपस्थित राहता आले नाही. मात्र सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याचं संजयला माहित असताना देखील तो परदेशवारीला रवाना का झाला असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, ‘संजू’ प्रदर्शित होण्यापूर्वी पासूनच संजय प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी तो असं करत असल्याची चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ चार दिवसामध्ये १४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:45 pm

Web Title: why sanjay dutt missing from film sanju success party
Next Stories
1 बॉडीगार्ड शेराच्या मुलाचंही बॉलिवूडमध्ये करिअर घडवणार सलमान
2 Gul Makai motion poster: मलालाची कहाणी मोठ्या पडद्यावर
3 प्लास्टिकबंदी: दंडवसुलीवर आधारित ‘कॅरी ऑन! व्हिडिओ’ व्हायरल
Just Now!
X