छोट्या पडद्यावर सर्वाधिक गाजलेला आणि लोकप्रिय शो म्हणजे द कपिल शर्मा शो. आतापर्यंत या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण टीम आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. मात्र, आता कपिलची हीच टीम हळूहळू कमी होताना दिसत आहे. अलिकडेच कॉमेडियन भारती सिंग हिला ड्रग्स प्रकरणी अटक झाल्यानंतर तिला या शोमधून काढून टाकल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, तिच्यापूर्वी अनेक कलाकारांनी या शोमधून काढता पाय घेतला आहे.
सगळ्या आधी अभिनेता सुनील ग्रोवर याने कपिलच्या शोला रामराम केला. कपिल आणि सुनील यांच्यात काही कारणास्तव वाद झाले होते. त्यामुळे सुनीलने हा शो सोडल्याचं सांगण्यात येते. या शोमध्ये सुनीलने साकारलेली गुत्थी, डॉक्टर गुलाटी या भूमिका विशेष गाजल्या.
आणखी वाचा- भारती सिंहवरुन ट्रोल केल्यामुळे भडकला कपिल, म्हणाला ‘पहिले तुझ्या…’
सुनील नंतर या शोमधली बुआ म्हणजेच उपासना सिंहने कपिलच्या शोमधून काढता पाय घेतला. त्यानंतर शोमधली दादी आणि नानीची भूमिका साकारणाऱ्या अली अजगर याने देखील हा शो सोडला. मला ही भूमिका करण्यात फारसा रस नव्हता असं म्हणत अली असगरने हा कार्यक्रम सोडला.
दरम्यान, या कालाकारांना नंतर नवज्योत सिंह सिद्धु यांनीदेखील हा शो सोडला. पुलवामा हल्ल्याविषयी एका ट्विट केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर त्यांना हा शो सोडावा लागला. सध्या त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पूरणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 30, 2020 2:26 pm