मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खानचा ‘लगान’ चित्रपट त्याच्या करिअरमधील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या चित्रपटात एक असं गाव दाखवण्यात आलं होतं. जिथे लोक कराच्या ओझ्याखाली दबलेले होते. या चित्रपटाची कथा एवढी दमदार होती की हा चित्रपट ऑस्करसाठी देखील नॉमिनेट झाला होता. १५ जून २००१ ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं जाणून घेऊयात या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचा गायत्री मंत्राचा किस्सा…

लगान चित्रपटात ‘अर्जन लोहार’ची भूमिका साकारणाऱ्या अखिलेंद्र मिश्रा यांनी हा किस्सा ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. ते म्हणाले, “लगानच्या शूटिंगच्या वेळीचं आमचं शेड्युलही खूप वेगळं होतं. आम्ही सगळेजण सकाळी ६ वाजता आम्ही सगळे बसमधून सेटवर जायचो. त्या बसचं नाव अॅक्टर बस असं होतं. सर्व कलाकार आणि स्वतः आमिर खान देखील याच बसने हॉटेलवरून सेटवर जात असत. मी पहिल्याच दिवशी सकाळी गायत्री मंत्राची कॅसेट ड्रायव्हरला दिली. तेव्हापासून लोक बसमध्ये येऊन बसले की गायत्री मंत्र सुरू व्हायचा. त्या संपूर्ण प्रवासात सर्वजण गायत्री मंत्र ऐकत असत. जेव्हा बस सेटच्या ठिकाणी पोहोचायची तेव्हा मंत्र बंद व्हायचा. चित्रपटाचं शूटिंग ६ महिने सुरू होतं पण यातला एकही दिवस असा नव्हता ज्या दिवशी आम्ही गायत्री मंत्र ऐकला नाही.”

आणखी वाचा- मुनव्वरनं उडवली जस्टिन बीबरच्या आजाराची खिल्ली, भडकलेल्या चाहत्यांनी चांगलंच सुनावलं

अखिलेंद्र यादव पुढे म्हणाले, “६ महिने बसमध्य रोज गायत्री मंत्र सुरू होता आणि अचानक आमिर खानने मला विचारलं या मंत्राचा नक्की अर्थ काय आहे? तेव्हा मी त्याला या मंत्राचा अर्थ समजावून सांगितला. ६ महिने हा मंत्र बसमध्ये रोज लावला जायचा आणि एखाद्या दिवशी जर उशीर झाला तर लोक येऊन विचारायचे अरे आज गायत्री मंत्र लावला नाही का? लोकांना गायत्री मंत्र ऐकायची सवय झाली होती. भूज ते चंपानेरचं हे अंतर २९ किलोमीटर होतं आणि या संपूर्ण प्रवासात हा मंत्र सतत सुरू असायचा.”

आणखी वाचा- Y trailer: महिन्यातील शेवटचा शुक्रवार आणि धक्कादायक घटनांचं वास्तव, ‘वाय’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘लगान’ चित्रपटाची ही कथा काल्पनिक आहे. जी मध्य भारतीत एका गावाची कथा आहे. या चित्रपटात इंग्रजांनी कर माफ करावा यासाठी गावातील लोक क्रिकेट खेळण्याची पैज लावतात. क्रिकेटवर आधारित असलेला हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. चित्रपटाचं दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी केलं होतं. ज्यांना या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली. चित्रपटाच्या सुरुवातील अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.