छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा कायमच चर्चेत असतो. पण अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकतंच मधुराणी गोखले हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

मधुराणी गोखले या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. त्या नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी तिने इन्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. यात तिने अरुंधतीच्या भूमिकेबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

मधुराणी गोखले प्रभुलकर यांची पोस्ट

आपण आपल्या आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट करून पाहतो. आपल्या सोयीच्या परिघा बाहेर पडून काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपण आपल्याला खरे सापडायला लागतो. जशी ह्या छोट्या छोट्या पावलातून अरुंधतीला तिचं स्वत्व सापडत गेलं. इंस्टावरच्या एका फॅनपेजनी आज हे share केलं आणि पुन्हा एकदा मला भरून आलं. आतून आतून कृतज्ञ वाटलं त्या प्रत्येकाविषयी ज्यांच्यामुळे मी ही भूमिका करू शकले…आणि करू शकतेय, असेही तिने यात म्हटलं आहे

आज वेगवेगळ्या स्तरातल्या मला अनेक स्त्रिया भेटतात. गृहिणी असतात , शिक्षिका असतात, ऑफिसर असतात , उद्योजिका असतात….वेगवेगळ्या वयाच्या , वेगवेगळ्या आर्थिक , सामाजिक स्तरातल्या…. पण त्यांच्या प्रत्येकीच्या डोळ्यात मला भेटून हलकं पाणी असतं…. प्रत्येकिला अरुंधती मध्ये ती सापडली असते….कुठल्या न कुठल्या टप्प्यावर तिनी अरुंधती कडून प्रेरणा घेतलेली असते… अरुंधतीनी तिला धीर दिलेला असतो , सावरलेलं, एक आशेचा किरण दाखवलेला असतो .. अगदी मी स्वतः सुद्धा ह्याला अपवाद नाहीये हं..!, असेही ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमची अतिशय गुणी आणि हुशार लेखिका नमिता वर्तक , संवाद लेखिका मुग्धा गोडबोले आणि संवेदनशील दिग्दर्शक रवींद्र करमरकर सर , मी तर आहेच पण अशा असंख्य स्त्रिया तुमच्या आभारी आहेत आणि असतील, अशी पोस्ट मधुराणी प्रभूलकरने लिहिली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.