बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. आमिर मागच्या काही दिवसांपासून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आमिरच्या या चित्रपटाची वेगवेगळ्या कारणांनी चर्चा होताना दिसते. आमिर खान या चित्रपटात ‘लाल सिंग चड्ढा’ ही पंजाबी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. पण या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा पंजाबी का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर आता आमिरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचं उत्तर दिलं आहे.

आमिर खाननं नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. आमिरच्या या मुलाखतीची सध्या बरीच चर्चा आहे. ही मुलाखत प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घेतली होती. या मुलाखतीत आमिर खानने नागराज मंजुळेसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाबद्दल धम्माल गप्पा मारल्या. नागराज मंजुळे यांनी या मुलाखतीत आमिर खानला ‘या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा पंजाबी का? ही कल्पना कशी सुचली?’ असा प्रश्न विचारला. या आमिरनं ही व्यक्तिरेखा पंजाबी असण्याचं कारण स्पष्ट केलं.

आणखी वाचा- “अन् अचानक माझ्या लक्षात आलं…” आमिर खानने सांगितला आईचा ‘तो’ किस्सा

आमिर म्हणाला, “चित्रपटाची पटकथा अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे आणि जेव्हा त्यांनी पटकथा लिहिली तेव्हा मुख्य व्यक्तिरेखा ही सरदारजी म्हणूनच लिहिली होती. जेव्हा आम्ही पटकथा वाचली तेव्हा आम्हाला त्यात काही गैर वाटलं नाही. आम्हालाही ती संकल्पना आवडली. त्यामुळे आम्ही ती तशीच ठेवली आणि त्यावर काम सुरू केलं. त्यामुळे ही व्यक्तिरेखा पंजाबी आहे.”

आणखी वाचा- “आम्ही कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी पण तुम्ही…” नागराज मंजुळेंबाबत आमिर खानने केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं असून या चित्रपटामध्ये नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.