बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून तिचं नावं आराध्या आहे. आराध्याने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही तरी देखील तिची लोकप्रियता कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाही. काही दिवसांपूर्वी आराध्याचा एक जुने फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हे फोटो आराध्याच्या शाळेतील एका कार्यक्रमाचा आहे.

आराध्याचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे आराध्याचे शाळेतील फोटो आहेत. आराध्या यावेळी सीतेच्या अवतारात दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. त्याचवेळी तिच्यासोबत तिचे काही मित्र-मैत्रिणीही दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोवर नेटकरी कमेंट करत आराध्याची स्तुती करत आहेत.

आणखी वाचा : “मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण भारतातच…”, अजान, हनुमान चालीसा प्रकरणावर अनुराधा पौडवाल यांचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “यांची मुलं यांना पाहून…”; हृतिक-सबा, सुझान आणि अर्सलन गोणीला एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आराध्याने सीतेची भूमिका केली असून रामाची भूमिका ही आमिरचा मुलगा आझाद राव खानने साकारली आहे. त्यांची ही क्युट जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हा व्हिडीओ आराध्याच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतील आहे.