scorecardresearch

“आधी बायकोला जवळ ओढले अन् मग मिठी…” ऐश्वर्या-अभिषेकचा सेलिब्रेशनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

जयपूर पिंक पँथर्स विजयी ठरल्यानंतर त्याचा कुटुंबियांबरोबर सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

“आधी बायकोला जवळ ओढले अन् मग मिठी…” ऐश्वर्या-अभिषेकचा सेलिब्रेशनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
ऐश्वर्या-अभिषेकचा सेलिब्रेशनचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

प्रो कबड्डी लीगचा नवव्या हंगामाच्या विजेतेपदाचा मान जयपूर पिंक पँथर्सने मिळवला. जयपूर पिंक पँथर्स या संघाने पुणेरी पलटनचा ३३-२९ असा पराभव करून विजेतेपदाचा मान मिळला. जयपूरचे हे दुसरे विजेतेपद ठरले. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा जयपूर पिंक पँथर्सचा मालक आहे. जयपूर पिंक पँथर्स विजयी ठरल्यानंतर त्याचा कुटुंबियांबरोबर सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामातील अंतिम सामन्याच्या पूर्वार्धातील खेळ आकर्षक ठरला. जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटनचा हा सामना चांगलाच रंगतदार झाला. तब्बल ८ वर्षांनी जयपूर पिंक पँथरने प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले. यानंतर या टीमचा मालक अभिषेक बच्चनने मैदानातच जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आणखी वाचा : प्रो कबड्डी लीग : जयपूर पिंक पँथर्सला विजेतेपद

याचा एक व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भय्यानीने शेअर केला आहे. यात अभिषेक बच्चन हा जयपूर पिंक पँथर्सच्या विजयानंतर मैदानातच आनंद व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी त्याच्याबरोबर त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन आणि लेक आराध्या बच्चनही पाहायला मिळत आहे.  ते तिघेही जण हा सामना पाहताना दिसत आहे. जयपूर पिंक पँथर हा सामना विजयी झाला हे कळताच अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला जवळ ओढले आणि तिला मिठी मारली. त्यानंतर त्या दोघांनीही जंगी सेलिब्रेशन केले.

यानंतर त्या तिघांनी मैदानात टीमबरोबर फोटोसाठी पोज दिली. तसेच यावेळी आराध्याही संपूर्ण टीमबरोबर नाचताना दिसत आहे. टीमच आनंदी झाल्याचा आनंद ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकताना पाहायला मिळत आहे. यावेळी त्या तिघांच्या डोळ्यात आनंदाश्रूही पाहायला मिळाले.

ऐश्वर्या राय बच्चनने यातील काही खास फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात अभिषेक त्याची पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्यासोबत आनंदाने नाचताना दिसत आहे.

आणखी वाचा : “तू सत्य मानणार नाहीस आणि…” रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान विजयाच्या जवळ येऊनही पुणेरी पलटण संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. त्यांच्या चढाईपटूंना मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. अंतिम सामन्याच्या पूर्वार्धातील खेळ आकर्षक ठरला. जयपूरला पलटणकडून जबरदस्त प्रतिकार झाला. मध्यंतराला खेळ थांबला, तेव्हा जयपूरकडे १४-१२ अशी दोनच गुणांची आघाडी होती. पुढे जाऊन हीच आघाडी निर्णायक ठरली.

पलटणने सामन्याची आघाडीने सुरुवात केली. मात्र, पुढे त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. पलटणच्या बचावपटूंना येत असलेले अपयश त्यांच्यासाठी मारक ठरले. उत्तरार्धात सुरुवातीलाच पलटण संघाला लोणला सामोरे जावे लागले. त्यामुळे जयपूरची बाजू भक्कम झाली. अखेरच्या टप्प्यात जयपूरकडे २५-२१ अशी आघाडी होती. या टप्प्यात जयपूरच्या खेळाडूंनी दाखवलेला संयम महत्त्वाचा ठरला. त्याच वेळी पलटणचे चढाईपटू आपला खेळ उंचावू शकले नाहीत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 12:12 IST

संबंधित बातम्या