बॉलिवूड अभित्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चनची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला जवळपास १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेण्याची इच्छा ही त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. या विषयी अभिषेकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

अभिषेकने नुकतीच रणवीर सिंगच्या ‘द रणवीर सिंग पॉडकॉस्ट’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या पहिल्याभेटीविषयी सांगितले आहे. “अमिताभ बच्चनच्या ‘मृत्युदाता’ या चित्रपटासाठी मी प्रोडक्शन बॉय म्हणून काम करत होतो. त्यानंतर जिथे मी लहानाचा मोठा झालो तिथे म्हणजेच स्वित्झर्लंडला मला स्कॉट म्हणून पाठवण्यात आले होते. तिथेच बॉबी देओल त्याच्या ‘और प्यार हो गया’ या त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा ऐश्वर्या ही तिथेच होती आणि बॉबीने मला रात्री जेवायला बोलावले”, असे अभिषेक म्हणाला.

आणखी वाचा : ‘खायला पैसे नव्हते, अक्षरश: बिग बींनी घरात काम करणाऱ्यांकडून पैसे…’, अभिषेकने केला खुलासा

पुढे अभिषेक म्हणाला, “तो ऐश्वर्याचा पहिलाच चित्रपट होता आणि ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी तिला भेटलो होतो. आता जेव्हा पण ती याविषयी बोलते तेव्हा ती हसते आणि बोलते ‘तू काय बोलत होतास मला काहीच कळत नव्हतं.’ कारण मी इंटरनॅशनल बोर्डिंग शाळेतून शिकून नंतर बोस्टनला गेलो होतो. त्यावेळी माझे इंग्रजी भाषेचे उच्चार हे नक्कीच वेगळे असणार. त्यावर तिची प्रतिक्रिया अशी असेल की, ‘हा नक्की काय बोलतोय? त्यावेळीच बॉलिवूडमध्ये काम करण्याआधी मी हिंदी भाषेची शिकवण घेतली पाहिजे, असा सल्ला मला माझ्या वडिलांनी दिला होता.”

आणखी वाचा : पहिल्यांदा वडिलांनीच दिला होता मद्याचा ग्लास आणि ४ बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला, ट्विंकलने केला होता खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिषेक लवकरच ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिव्या अन्नपूर्णा गोष यांनी केले आहे.