करोना काळानंतर आता अनेक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेक चित्रपटांच्या निर्मितीची घोषणाही करण्यात आली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री शहनाज गिलचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबतच त्याचा मेहुणा आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल हे देखील स्क्रीन शेअर करणार होते. पण मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांच्यासोबत चित्रपटाबाबत मतभेद झाले आहे. त्यामुळे त्या दोघांनाही या चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कभी ईद कभी दिवाली’ बहुचर्चित चित्रपटाचे शूटींगला नुकतंच सुरुवात झाली. या चित्रपटातील अनेक दृश्य आयुष शर्माने शूट केले आहे. मात्र आता काहीतरी वाद झाल्याने त्याने या चित्रपटातून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान आणि आयुष यांच्यात काही मतभेद झाल्याचे बोललं जात आहे. या मुद्द्यावरुन वाद वाढल्यानंतर या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माचा नवरा आहे. त्या दोघांमध्ये छान बॉन्डिंग आहे. अनेकदा ते दोघेही एकत्र दिसतात. नुकतंच आयुष शर्मानेही एक ईद पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये सलमानची उपस्थितीही पाहायला मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटात पूजा हेगडे, राघव जुयाल आणि तेलुगू अभिनेता वेंकटेश दग्गुबाती यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं शूटिंग मुंबईच्या विलेपार्ले येथील एका सेटवर सुरू झालं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ डिसेंबर २०२२ ला प्रदर्शित होणारआहे.