scorecardresearch

Premium

८३व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेते चौथ्यांदा होणार बाबा, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाले, “यावेळी खूप…”

त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्यापेक्षा ५२ वर्षांनी लहान आहे.

al-pacino

हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अल पचिनो सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. वयाच्या ८३व्या वर्षी ते चौथ्यांदा वडील होणार आहेत. नूर अल्फल्लाह ही पचिनो यांची गर्लफ्रेण्ड आहे. गेले अनेक महिने ते नूरला डेट करत आहेत. तर आता त्यांनी तिच्या गरोदरपणाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

२०२२ मध्ये नूर व पचिनो यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सुरुवात झाली. या दोघांचे एकत्रित डिनर डेटचे फोटो व्हायरल झाले होते. नूर पचिनो यांच्यापेक्षा ५२ वर्षांनी लहान आहे. सध्या हे दोघं आई-बाबा होण्याचा आनंद सध्या साजरा करत आहेत. तर नूर गरोदर असल्याचं समोर येताच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या गेल्या. आता या बातमीवर अल पचिनो यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

आणखी वाचा : “नवरा कमी आणि वडीलच जास्त वाटतोय…,” सोनाली सेहगलच्या लग्नाच्या फोटो व्हायरल, अभिनेत्री ट्रोल

नूरने ११ आठवडे ती गरोदर असल्याचं अल पचिनो यांना सांगितलं नव्हतं. त्यांना आणखी अपत्य नको आहेत हे तिला माहीत होतं. तिच्या गरोदरपणाबद्दल कळताच अल पचिनो खूप आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी ‘प्री-नेटल डीएनए टेस्ट’चीही मागणी केली असं बोललं जात होतं. आता अखेर त्यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, “हे माझ्यासाठी खूप खास आहे…नेहमीच हे खूप खास असतं. मला अनेक मुलं आहेत पण या वेळचं हे बाळ खरोखरच स्पेशल आहे.”

हेही वाचा : आधी दोन अफेअर, तीन मुलं अन्…; आता ५२ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडपासून ८३व्या वर्षी चौथ्यांदा बाबा होणार सुप्रसिद्ध अभिनेता

तर याआधी नूरचे नाव अनेक जणांबरोबर जोडलं गेलं होतं. नूरने ७४ वर्षीय सुप्रसिद्ध गायक मिक जॅगरला डेट केलं होतं. शिवाय ६० वर्षीय निकोलस बर्गग्रेनबरोबरही नूर रिलेशनशिपमध्ये होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor al pacino expresses his feelings of becoming father for the forth time rnv

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×