अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकार मंडळी सोशल मीडियाचा उत्तम वापर करतात. फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे कलाविश्वातील मंडळी चाहत्यांशी संवाद साधताना आपल्याला दिसतात. सोशल मीडियाचे बरेच फायदे आहेत. पण त्याचबरोबरीने काही तोटे सुद्धा आहेत. ज्यामुळे कलाकारांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. असंच काहीसं अभिनेते अमोल कोल्हे (Amol kolhe) यांच्याबाबतीत घडलं आहे. त्यांचं सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करण्यात आलं आहे.

आणखी वाचा – “आमिर खान कधीच बॉयकॉट होऊ शकत नाही कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’बाबत स्पष्टच बोलली एकता कपूर

अमोल कोल्हे यांचं फेक इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर हे या अकाउंटद्वारे इतर लोकांना मॅसेज पाठवून त्यांच्याकडून पैश्यांची मागणी केली जात आहे. याबाबत अमोल यांनीच पोस्ट शेअर करत माहिती दिली. तसेच या फेक प्रकारापासून सावध राहण्यासही अमोल यांनी सांगितलं आहे.

“@kdr.amol या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशांची मागणी केली जात आहे. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इन्स्टा युजरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या. ” असं अमोल यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : “माझे स्तन तापसीपेक्षा…” अनुराग कश्यपचं ‘ते’ विधान चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

तसेच त्यांनी फेक अकाउंटचा फोटो आणि त्याद्वारे पाठवले जाणारे मेसेज याचा फोटो देखील शेअर केला आहे. या फेक अकाउंटमुळे इतर कोणाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून अमोल कोल्हे यांनी याबाबत लगेचच माहिती दिली. याआधीही अनेक कलाकारांच्या बाबतीत हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं होतं.