शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकासआघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. एकीकडे राजकीय तर्कविर्तक लावले जात असताना दुसरीकडे अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णी, आरोह वेलणकर यानंतर आता अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे हा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. हेमंत हा नेहमी विविध मुद्द्यांवर मत मांडताना दिसतो. नुकतंच हेमंत ढोमे याने एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत उपरोधिक ट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं : एकनाथ शिंदे

“आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची! पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटी ला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती…काय म्हणता?” असे हेमंत ढोमे म्हणाला. त्यासोबत त्याने ‘बंड’ असा हॅशटॅगही वापरला आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय…”, अभिनेता आरोह वेलणकरणचे ‘ते’ ट्विट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सुरतहून गुवाहाटीला पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यात शिवसेनेचे ३३ आमदार असून सात अपक्ष आमदारांचा समावेश आहे. काल सायंकाळी शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंदरम्यान चर्चा झाली. मात्र त्यानंतरही मध्यरात्री एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत गुवहाटीला गेल्याने ही चर्चा फिस्कटल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे राजकीय तर्कविर्तक लावले जात असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.