‘पुष्पा’, ‘केजीएफ’, ‘विक्रमसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवूडच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. आता आणखीन एक बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटली येत आहे. या चित्रपटाचं नाव ‘पोन्नियन सेल्वन’ असून प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अनेक दाक्षिणात्य कलाकार दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला ऐश्वर्या राय हीअभिनेत्री दिसणार आहे. हा ऐतिहासिक चित्रपट आहे. यातील कथानक चोल साम्राज्याशी संबंधित आहे.

याच चित्रपटातील कलाकार कार्थी, मुंबईमध्ये चित्रपटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत असं म्हणाला की ‘या चित्रपटातील पात्र बघून तुम्हाला रामायण महाभारतातील पात्र आठवतील. हे कथानकांमध्ये दाखवणे कठीण होते मात्र हा अनुभव सुखद होता’. याच पत्रकार परिषदेत अभिनेता विक्रम म्हणाला की,’अमेरिका जरी महासत्ता असली तरी आपण त्यांच्याआधी इतिहासात प्रगल्भ होतो. आपली संस्कृती, इतिहास आणि आपण सगळे भारतीय एक आहोत याचा आपल्याला अभिमान हवा’.

PS-I चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दाक्षिणात्य स्टार विक्रम म्हणाला, ” आपण भारतीय आहोत आपल्याला.. “

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच हा यूट्यूबवर हिट झाला आहे. ऐश्वर्या राय बच्चन राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तब्बल ४ वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे.या चित्रपटापूर्वी ऐश्वर्या राय आणि मणिरत्नम यांनी ‘गुरु’, ‘रावण’ आणि ‘इरुवर’ असे चित्रपट एकत्र केले होते. मणी रत्नम यांनी कायमच वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

PS-I दोन भागांमध्ये बनवला जात आहे, जो कल्कीच्या या लेखकाच्या पुस्तकावर आधारित आहे. दक्षिण भारतात दीर्घकाळ राज्य करणाऱ्या चोल साम्राज्याची ही कथा आहे. PS-I ३० सप्टेंबर रोजी पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट ‘विक्रम’ वेधा या हिंदी चित्रपटाला हा टक्कर देणार आहे. त्याचा ट्रेलरही पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. ‘पोनियान सेल्वन-I’च्या हिंदी ट्रेलरला अभिनेता अनिल कपूरने आवाज दिला आहे.