ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे अनेक पोस्टर, टिझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.

धर्मवीर या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच तो सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रचंड गाजला होता. काल १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

“दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने सांगितल्या खास आठवणी

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मवीर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.७५ ते १.९० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप या चित्रपटाच्या कमाईचा खरा आकडा समोर आलेला नाही.

अनेक तज्ज्ञांच्या मते हा चित्रपट विकेंडला आणखी चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच हा चित्रपट लवकरच १० कोटींचा टप्पा पार करेल असेही म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या निर्मितासाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Loksatta Exclusive : “माझी पत्नी दिवसातून चार ते पाच वेळा मेकअप मॅनला फोन करायची अन्…”, प्रसाद ओकने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या “धर्मवीर मुक्काम पोस्ट – ठाणे” हा चित्रपट महाराष्ट्रातील ४०० हून अधिक स्क्रिन्स आणि १० हजारहून अधिक मोठ्या पडद्यांवर झळकताना पाहायला मिळत आहे.