समीर चौगुलेच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकची खास पोस्ट, म्हणाला “तुझी वाक्यं छातीवर…”

अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

prasad oak sameer chougule

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते. समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. समीर चौगुलेचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता प्रसाद ओक याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने मोठ्ठा हा टीशर्ट परिधान केलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत त्याची पत्नी मंजिरी ओकही दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी समीर चौगुलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“सम्या विशु या जोडीच्या यशात बहुतांश वाटा…”, समीर चौगुलेंची विशाखा सुभेदारसाठी खास पोस्ट

प्रसाद ओकची इन्स्टाग्राम पोस्ट

“समीर चौघुले “मोठ्ठा” हो. “मोठ्ठी” उंची गाठ. आमचा अत्यंत लाडका अभिनेता आणि सच्चा मित्र…!!! वाढदिवसाच्या अनंत कोटी, शुभेच्छा मित्रा…!!!

“एखाद्या अभिनेत्याच्या तोंडची वाक्यं एवढी प्रसिद्ध व्हावीत… कि त्या वाक्यांचा brand बनावा आणि त्याचे T-shirts यावेत.” हे असं काही या आधी कधीही मराठी मनोरंजन विश्वात घडल्याचं मला तरी माहिती नाही. या बद्दल समीरचं प्रचंड अभिनंदन…!!! आणि या साठी पु.ल. आणि मंडळी यांनी जे काही केलंय त्याचंही खूप खूप कौतुक…!!!

सम्या… उत्तरोत्तर तुला अशी खूप खूप धमाल वाक्यं सुचो… त्याचे हजारो T-shirts बनो आणि ते घालण्याची आणि तुझी वाक्यं छातीवर अभिमानाने मिरवण्याची संधी आम्हा पामरांना वारंवार मिळो हीच प्रार्थना…!!!! वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशी पोस्ट प्रसाद ओकने केली आहे.

“तू या क्षणी जिथे असशील तिथे…”, समीर चौगुलेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्रसाद ओकच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी समीर चौगुलेला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक कमेंट आणि लाईक्सही पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor prasad oak birthday wish to maharashtrachi hasya jatra programme actor samir choughule nrp

Next Story
Udaipur Murder : उदयपूर हत्या प्रकरणावर बॉलिवूड सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची केली मागणी
फोटो गॅलरी