scorecardresearch

Takatak 2 Trailer : ‘टकाटक २’चा सर्वात बोल्ड ट्रेलर प्रदर्शित, इंटिमेट सीन अन् संवादांमुळे चित्रपट चर्चेत

मराठीमधील सगळ्यात बोल्ड चित्रपट ‘टकाटक २’चा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित झाला आहे.

Takatak 2 Trailer : ‘टकाटक २’चा सर्वात बोल्ड ट्रेलर प्रदर्शित, इंटिमेट सीन अन् संवादांमुळे चित्रपट चर्चेत
मराठीमधील सगळ्यात बोल्ड चित्रपट 'टकाटक २'चा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित झाला आहे.

मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘टकाटक’. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं पोस्टर, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘टकाटक २’चा ट्रेलर (Takatak 2 Trailer) प्रदर्शित झाला आहे.

आणखी वाचा – Photos : १९व्या वर्षी लग्न अन् ३२ वर्षांचा सुखी संसार, मृणाल कुलकर्णी यांचे पतीबरोबरचे सर्वात सुंदर फोटो

अभिनेता सुबोध भावेच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मित्रांचा ग्रुप, त्यांची धमाल-मस्ती, त्यांच्यातील मिश्किल संवाद, विनोदी आणि भावूक प्रसंग, मनोरंजक गाणी याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरीने चित्रपटाच्या ट्रेलरमधील बोल्ड सीन्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तसेच काही इंटिमेट सीन्सची झलकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमधील काही बोल्ड संवाद आणि सीन पाहता मराठीमध्ये पुन्हा नवा प्रयोग केला जात असल्याचं दिसून येत आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. म्हणजेच ‘दगडी चाळ २’ चित्रपटाबरोबर ‘टकाटक २’ची टक्कर होणार आहे.

आणखी वाचा – यावर्षी चिपळूणमध्ये पूर का आला नाही? अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं कारण

‘टकाटक २’मध्ये बोल्डनेसचा तडका तसेच धमाल मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवता येईल. प्रथमेशबरोबरच अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक २’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या