मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी निर्माण करणारा अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयस तळपदे हा सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशची भूमिका साकारत आहे. या मालिकेद्वारे त्याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यातच लवकरच तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आपडी थापडी असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. श्रेयस तळपदे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भन्नाट युक्ती केली आहे.

आपडी थापडी हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर लहानपणी ऐकलेले बडबड गीत येते. याच गीताचा वापर करुन श्रेयसने त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. श्रेयस तळपदे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच श्रेयसने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रेयस हा आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू, तेल काढू हे बडबड गीत बोलताना दिसत आहे. यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा केला आहे. त्याच्या या बेबी फेसची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा : …म्हणून श्रेयस तळपदे घरातील बाप्पाचे कधीही विसर्जन करत नाही, जाणून घ्या कारण

फक्त श्रेयस नव्हे तर मुक्ता बर्वेनेही अशाचप्रकारे व्हिडीओ शेअर केला आहे. श्रेयस, संदीप, नंदू माधव यांचे क्यूट व्हिडीओ पाहून मला देखील राहवलं नाही. चला मग तुम्ही सुद्धा तुमचे असेच गोड गोड व्हिडीओज बनवून पोस्ट करा आणि तुमच्या ५ फ्रेंड्सना टॅग करा, असे आवाहन मुक्ताने इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे केले आहे.

आणखी वाचा : श्रेयस तळपदे- मुक्ता बर्वेची केमिस्ट्री आली समोर…‘आपडी थापडी’चा टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपडी थापडी” या चित्रपटाची ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन आहे. या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे असे अनेक दमदार कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे.