अभिनेता वरुण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉनसह अभिषेक बॅनर्जी, सौरभ शुक्ला, दीपक डोबरियाल यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. ‘स्त्री’ आणि ‘रूही’ नंतर दिनेश विजानचा ‘भेडिया’ हा तिसरा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. वरुण धवनचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात भेडिया अभिनेता थेट वाघासमोर आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

वरुण धवन इतर बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी सुट्टीवर गेला आहे. पत्नी नताशा दलालबरोबर तो सध्या जंगल सफारी एन्जॉय करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो जंगल सफारी करत आहे आणि त्याच्यासमोर वाघ फिरत आहे. जेव्हा (भेडिया इमोजी) (टायगर इमोजी) ला भेटतो असा कॅप्शन दिला आहे. त्यावर अभिनेता अर्जुन कपूरने कमेंट केली आहे की “कॅप्शन छान आहे.”

“मला माफ करा…” सोनू सूदचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

वरुणच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्याच्या एका चाहत्याने लिहिले, “हॅपी न्यू इयर व्हीडी. आज मजा कर, स्वतःची काळजी घे , तुझ्यावर मी प्रेम करतो.” दुसर्‍या एका चाहत्याने लिहिले आहे “भाई जरा सांभाळून.” अनेक चाहत्यांनी वरुणला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो शेवटचा कियारा आडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्याबरोबर ‘जुगजुग जियो’मध्ये दिसला होता. आगामी काळात तो जान्हवी कपूरबरोबर ‘बवाल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असून हा चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.