काही महिन्यांपूर्वी ‘पोन्नियिन सेल्वन-१’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना भारावून टाकले. त्यानंतर या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या चित्रपटाचा दुसरा भाग २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही अभिनेत्री ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेसाठी तिने मोठे मानधन आकारले आहे. या चित्रपटासाठी तिने किती फी घेतली हा आकडा आता समोर आला आहे.

‘पोन्नियिन सेल्वन-२’ ची कथा महान चोल सम्राट राजा चोल यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागातही कथा या राजाभोवती फिरताना दिसली होती. आता दुसऱ्या भागात ही कथा पुढे सरकताना दिसत आहे. ‘पोन्नियिन सेल्वन-१’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन-२’ हे दोन्ही चित्रपट प्रचंड खर्च करून बनवले गेले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी निर्मात्यांनी २५० कोटी रुपये खर्च केले होते. तर दुसरा भाग तयार करण्यासाठीही निर्मात्यांनी बराच खर्च केला आहे.

आणखी वाचा : जगभरात ‘पोन्नियिन सेल्वन: २’चा डंका, दुसऱ्याच दिवशी ओलांडला १०० कोटींचा पल्ला, भारतातून कमावले ‘इतके’ कोटी

या चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये काम करण्यासाठी तिने तब्बल १० कोटी मानधन घेतले होते. तर आता या चित्रपटाच्या पुढील भागासाठी तिने त्याहून जास्त रक्कम फी म्हणून आकारली आहे. ‘पोन्नियिन सेल्वन-२’ या चित्रपटातील तिच्या कामाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी ऐश्वर्या रायने १२ कोटी मानधन घेतले आहे.

हेही वाचा : ‘कांतारा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन’मधील स्पर्धा चित्रपटगृहाबाहेरही राहणार सुरू, ‘हे’ आहे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पोन्नियिन सेल्वन-२’ मध्ये ऐश्वर्या रायबरोबरच विक्रम, जयम रवी, कार्ती, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट भारतात तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम् अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.