अभिनेत्री पूनम पांडे ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे ओळखली जाते. तिच्या वागण्या बोलण्याने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये तिची उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेते. बिग बॉस अभिनेता प्रतीक सहजपालच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिने हजेरी लावली होती. यावेळी तिने बेशरम रंग गाण्यावर डान्स केला ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सोमवारी प्रतिकने आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. टीव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी या पार्टीला हजर होती. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते पूनमच्या डान्सने. पूनमचा पार्टीतला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये ‘बेशरम’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. पार्टीसाठी डीप नेक टॉप पूनमने परिधान केला होता.

Fifa WC 2022 Final: “खरी ट्रॉफी तर….” रणवीर सिंगचा रोमँटिक अंदाज, दीपिकाबरोबरचा फोटो केला शेअर

पूनमच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे “दीपिकाच्या हिलाच ऐवजी घ्यायला हवे होते.” तर दुसऱ्याने लिहले आहे “बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा ही चांगली आहे,” अशा शब्दात त्यांनी पूनमचे कौतुक केले आहे. एकाने लिहले आहे “दीपिकापेक्षा चांगला डान्स हिने केला आहे.”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूनम पांडे कंगना रणौतच्या वादग्रस्त शो ‘लॉकअप’मध्ये दिसली होती. या शोमध्ये करणवीर बोहरादेखील होता. शोमधून बाहेर पडल्यानंतरही या दोघांचे बाँडिंग वाढले आहे. पूनम मूळची कानपूरची असून गेली अनेकवर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. २०१३ साली आलेल्या नशा या चित्रपटातून तिने पदार्पण केले. आपल्या बोल्ड फोटोमुळे ती अनेकदा वादात सापडते.