चंदेरी दुनियेतील कलाकार चर्चेत राहण्यासाठी नेहमीच कोणता ना कोणता पर्याय शोधून काढतात. इतकंच नव्हे तर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर नवनवीन कल्पना सुचवतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील यापैकीच एक आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘निकम्मा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आणखी वाचा – “कर्करोगाने गाठलं अन् चौथ्या दिवशीच…” मरणाच्या दारातून परतली सोनाली बेंद्रे, सांगितला संपूर्ण प्रवास

‘निकम्मा’च्या प्रमोशनसाठी शिल्पा दिल्लीला गेली होती. दिल्लीमध्ये शिल्पाने चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. या प्रमोशनदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा ‘निकम्मा’ चित्रपटातील गाण्यावर चक्क थिएटरच्या छतावर चढून डान्स करत आहे. तसेच तिच्याबरोबर या चित्रपटामधील कलाकार अभिमन्यु दसानी, शर्ली सेतिया देखील डान्स करताना दिसत आहेत.

तसेच शिल्पाने भररस्त्यात देखील चित्रपटाच्या टीमबरोबर मनसोक्त डान्स केला. यावेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. काही तासांमध्येच शिल्पाच्या या व्हिडीओला भरभरुन पसंती मिळाली आहे. पण काही जणांनी नकारात्मक कमेंट देखील केल्या आहेत. एका युजरने कितीही प्रयत्न केला तरी चित्रपट फ्लॉप होणार असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा संशयास्पद मृत्यु; राहत्या घरी आढळला मृतदेह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये शिल्पा एका वेगळ्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळाली. २०१७मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिडिल क्लास अब्बाई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. करोनामुळे रखडलेला हा चित्रपट १७ जूनला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.