scorecardresearch

‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली, “आमिर खान म्हणजे…”

अभिनेत्री स्वरा भास्करने ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पाहिल्यानंतर ट्वीट केलं आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली, “आमिर खान म्हणजे…”
अभिनेत्री स्वरा भास्करने 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट पाहिल्यानंतर ट्वीट केलं आहे.

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाबाबत सध्या बऱ्याच चर्चा रंगत आहेत. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’बाबात तर बऱ्याच कलाकार मंडळींनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. आमिरला पाठिंबा देत बॉयकॉट करणं हा पर्याय नसल्याचं कलाकारांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर आपला चित्रपट पाहण्यासाठी आमिर, करीना कपूर खानने प्रेक्षकांना आवाहन केलं होतं. एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) या चित्रपटाबाबत केलेले ट्वीट चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – “अजूनही फिल्टर पाड्यातील चाळीतच राहतो कारण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं कसं आहे खरं आयुष्य?

‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’बाबत कलाकार मंडळी आमिर खानला साथ देताना दिसत आहेत. आता अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत ट्वीट केलं आहे. स्वराने ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पाहिला. इतकंच नव्हे तर तिने ट्वीट करत आमिर तसेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं. यामुळे स्वराला ट्रोल देखील करण्यात आलं आहे.

स्वरा ट्वीट करत म्हणाली, “मी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पाहिला. आमिर खान म्हणजे एक देखणा शिख असंच म्हणावं लागेल. तसेच लिटल लाल आणि रुपा हे खूपच गोंडस आहेत. मोना सिंगने तर माझं मन जिंकलं.” एरव्ही काही बॉलिवूड कलाकार तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील इतर मुद्द्यांबाबत विरोधात बोलणाऱ्या स्वराने आमिरच्या चित्रपटाचं कौतुक केलं.

आणखी वाचा – Video : बिपाशा बासू गरोदर पण ट्रोल होतोय नवरा, करण ग्रोवरचं वागणं पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

स्वराच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सुपरफ्लॉप चित्रपटाचं कौतुक करत आहेस, करीना कपूरवर तू जळतेस म्हणून तिचं कौतुक केलं नाहीस, चित्रपट जर चांगला असता तर ट्वीट करण्याची तुला गरज पडली नसती अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी तिच्या ट्विटवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress swara bhaskar tweet after watching aamir khan lal singh chaddha movie she troll for her statement see details kmd

ताज्या बातम्या