‘भूलभुलैया ३’ हा चित्रपट सध्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांतून गर्दी खेचतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्री विद्या बालन ‘भूलभुलैय्या’ चित्रपट मालिकेतील तिसऱ्या चित्रपटात मंजुलिका म्हणून पुनरागमन करणार याची कोण चर्चा सुरू झाली. त्यात भरीस भर म्हणून विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांची नृत्याची जुगलबंदी पाहायला मिळणार याचाही प्रेक्षकांना आनंद झाला. या चित्रपटामुळे सध्या आनंदात असलेल्या विद्याने एका मुलाखतीदरम्यान बोलताना याआधी डझनावारी चित्रपटातून तिची भूमिका बदलली गेली होती, त्यामुळे नकार पचवण्याची हिंमत तिच्यात आहे. मात्र त्याच अनुभवामुळे इतरांशी वागताना किती प्रेमाने आणि सांभाळून वागलं पाहिजे, याची जाणीव झाल्याचेही तिने सांगितले.

हिंदी चित्रपटसृष्टीत नायक – नायिकांच्या सौंदर्याच्या काही रूढ व्याख्या आहेत. त्यानुसारच कोणाला चित्रपटात भूमिका द्यायची, कोणाला नाही हे ठरवले जात होते. सध्या हे प्रमाण कमी झाले असले तरी ते पूर्णपणे नष्ट झाले आहे, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. आता प्रथितयश अभिनेत्री म्हणून मिरवणाऱ्या विद्या बालनला तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिच्या दिसण्यावरून, शरीरयष्टीवरून अनेकदा नकार मिळाला. एका तमिळ चित्रपटासाठी नायिका म्हणून तिची निवड झाली होती. तिने काही दृश्यांचे चित्रीकरणही केले होते, मात्र अचानक तिला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्यावेळी निर्मात्याने तिच्या दिसण्यावरून केलेली वक्तव्यं तिच्या जिव्हारी लागली होती.

हेही वाचा >>>लग्नानंतर चार वर्षे दूर राहिले, करिअरमध्ये साथ अन्…; दिवाळी पाडव्याला मृणाल दुसानिसने पती नीरजचं केलं कौतुक

 ‘या चित्रपटातून अचानक काढून टाकण्यामागचं कारण विचारण्यासाठी मी आई-वडिलांना घेऊन निर्मात्याकडे गेले होते. मी दोन दिवस चित्रीकरणही केलं होतं आणि अचानक दोन दिवसांनी मला चित्रपटातून काढून टाकलं असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्या निर्मात्याच्या चेन्नई येथील कार्यालयात आम्ही गेलो होतो. त्याने माझ्यावर चित्रित झालेली काही दृश्यं दाखवली आणि कुठल्या अँगलने ही हिरॉईन दिसते? असा प्रतिप्रश्न माझ्या आई-वडिलांना केला. तिला नाचता येत नाही की अभिनयही येत नाही, असं त्याने सांगितलं. मी मात्र मनातल्या मनात म्हणत होते की मला अभिनय करू तर द्या.. दोनच दिवस झाले आहेत चित्रीकरण सुरू होऊन..’.

अर्थात, मनातल्या मनात सुरू असलेल्या तिच्या विचारांचा काही फायदा झाला नाही. पण या निर्मात्याने तिच्याबद्दल, तिच्या दिसण्याबद्दल केलेल्या विधानांमुळे ती इतकी दुखावली

गेली की, पुढचे सहा महिने तिने आरशात स्वत:कडे पाहिलं नाही. त्याचं बोलणं मनातून जाण्यासाठी थोडेथोडके नव्हे तर सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागल्याचंही तिने सांगितलं. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात विद्याने अभिनेता संजय दत्तबरोबर मुख्य भूमिकेत काम केलं होतं. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि तिचे दिवस पालटले.

हेही वाचा >>>ऐश्वर्या रायने नाकारलेला ब्रॅड पिटबरोबरचा हॉलीवूड चित्रपट, अभिनेता म्हणालेला, “पाश्चिमात्य देशांमध्ये…”

या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मला चांगले चित्रपट मिळत गेले, असं विद्याने सांगितलं. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूलभुलैया’ या पहिल्या चित्रपटात विद्याने मुख्य भूमिका साकारली होती. साधीसरळ अवनी आणि मंजुलिका अशा दोन अवतारात ती या चित्रपटात दिसली होती. तिने साकारलेली मंजुलिका प्रेक्षकांना आजही स्मरणात आहे. त्यामुळे ‘भूलभुलैया ३’ या चित्रपटात ती मंजुलिकाच्या भूमिकेत झळकल्याने साहजिकच तिचे चाहते आनंदले होते. सध्या विद्या बालनसह कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेला अनीस बाज्मी दिग्दर्शित ‘भूलभुलैया ३’ हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचतो आहे.

तुम्ही एखाद्याबद्दल शेरेबाजी करता.. तुम्हाला त्याचं किंवा तिचं काम आवडलं नाही. ठीक आहे, पण त्याविषयी बोलताना किमान शब्द जपून वापरायला हवेत. माझ्या सुरुवातीच्या दिवसांत आलेल्या या अनुभवामुळे मला समोरच्याशी कसं वागायला हवं याचा चांगला धडा मिळाला. त्या निर्मात्याच्या बोलण्यामुळे मी स्वत:बद्दलच साशंक झाले होते. कोणत्याही माणसाशी त्याचा आत्मविश्वास खच्ची होईल, अशा पद्धतीने बोचरं बोलणं, वागणं चुकीचं आहे ही खूणगाठ माझ्या मनाशी बांधली गेली, असंही विद्याने सांगितलं. अभिनेता मोहनलाल यांच्याबरोबरही विद्या एका चित्रपटात काम करणार होती, मात्र तो चित्रपट कधी झालाच नाही. त्यानंतर तिच्यावर कमनशिबी असल्याचा शिक्काच बसला होता. त्यामुळे किमान डझनावारी चित्रपटांतून आपल्याला एकतर काढून टाकण्यात आलं किंवा आपल्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला संधी दिली गेली, अशी आठवणही विद्या बालनने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांगितली.