दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुरुवातीला ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर तिने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात पहिल्यांदाच ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँग केले त्यामुळे ती चर्चेत होती. आता समांथाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर डान्स करताना दिसत आहे.

समांथा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क मध्यरात्री विमानतळावर डान्स करताना दिसत आहे. दरम्यान तिने व्हाइट शूज, काळ्या रंगाची जीन्स आणि डेनिम जॅकेट परिधान केले आहे. डान्स करतानाचा हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘आणखी एक रात्री उशिराची फ्लाइट…’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ‘दृश्यम २’च्या चित्रीकरणास सुरुवात, ‘ही’ अभिनेत्री दिसणार अजय देवगणसोबत

सध्या सोशल मीडियावर समांथाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांना समांथाचा डान्स आवडल्याचे दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथाने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँग केले होते. तिच्या गाण्यातील डान्सची सगळीकडे चर्चा सुरु होती. आता लवकरच समांथा अभिनेता विजय देवरकोंडाच्या चित्रपटात स्पेशल डान्स परफॉर्म करताना दिसणार आहे. तसेच तिने एक हॉलिवूड प्रोजेक्टही साइन केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘अरेंजमेंट ऑफ लव’ असे आहे.