मराठी ‘बिग बॉस’मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत, एकीकडे तिने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघत असताना मुंबईतील आंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे. मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो व्हायरल केल्याप्रकरणी राखीला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. शर्लिननेच राखीला अटक केल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली. शर्लिनने राखीचा नवरा अदिलबाबत भाष्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान चर्चेत आहेत. इन्स्टंट बॉलिवूडच्या प्रतिनिधीशी बोलताना शर्लिन चोप्रा म्हणाली, “काही दिवसांपूर्वी आदिल माझ्याकडे आला आणि म्हणाला, माझ्या पत्नीला माफ कर मी त्याला म्हंटले, तुझ्या पत्नीने एका महिलेचे आपत्तीजनक फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल केले, तुला माझ्याबद्दल थोडीपण सहानभूती नाही? असं का? तुझ्या पत्नीने एका महिलेबाबत असं वक्तव्य केलं की ती वेश्याव्यवसाय करते मात्र याबाबत काहीच सत्यात नाही कारण पोलिसांना या प्रकरणावर कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. त्यांनी कबूल केले की शर्लिन चोप्राच्या विरोधात कोणतीही एफआयर दाखल करण्यात आलेली नाही. तुला फक्त तुझ्या पत्नीबद्दल सहानभूती आहे माझ्याबद्दल नाही? असं का? कारण आम्ही सामान्य जनता आहोत म्हणून का? अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कधी एक्स बॉयफ्रेंडला मारहाण तर कधी शर्लिन चोप्राशी पंगा; ‘या’ कॉन्ट्रोव्हर्सींमुळे चर्चेत राहिलेली राखी सावंत

राखीचा भाऊ राकेश यांनी शर्लिन चोप्रावर आरोप केले आहेत. “शर्लिनसारख्या अभिनेत्रींमुळे पालक त्यांच्या मुलींना कलाविश्वात करिअर करण्यापासून रोखतात. शर्लिन तुझ्याकडून या क्षेत्रातील नवीन मुलं काय आदर्श घेतील?”, असंही ते पुढे म्हणाले. शर्लिन चोप्राविरोधात लवकरच तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतने यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळून लावल्याने आज राखीला अटक करण्यात आली.