Raj Kundra case: ‘त्या’ पोस्टनंतर शिल्पा शेट्टीला वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिससह बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा

बॉलिवूड सेलिब्रीटींसह अनेक टीव्ही कलाकारांनी देखील शिल्पाच्या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.

shilpa-shetty-
(File Photo-Shilpa Shetty)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात देखील बऱ्याच चर्चा झाल्या. शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने या सगळ्यांचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम होत आहे ते सांगितले असून कोणतीही खोटी बातमी छापू नका असे सांगितले आहे.

शिल्पाने शेअर केलेल्या स्टेटमेंटमध्ये तिने तिच्या कुटुंबाच्या गोपनियतेचा आदर राखण्याची विनंती केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील शिल्पाच्या अनेक जवळच्या मित्र मैत्रिणींपासून सहकलाकांनी देखील या विषयावर मौन बाळगलं होतं.मात्र शिल्पाच्या या भावनिक पोस्टनंतर आता अनेक सेलिब्रिटींनी शिल्पाला पाठिंबा दिला आहे.

बॉलिवूडमधील वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस, मिजान जाफरी, संजय कपूर, दिया मिर्झा, फरहा खान, राकुल प्रित या सेलिब्रिटींनी शिल्पाच्या या भावूक पोस्टला पसंती दिलीय. तर शिल्पाची बहीण शमिता शेट्टीने देखील शिल्पाला आधार दिला आहे. ” आय लव्ह यू माय मूनकी, कायम तुझ्यासोबत आहे. प्रत्येक रुपात”

बॉलिवूड सेलिब्रीटींसह अनेक टीव्ही कलाकारांनी देखील शिल्पाच्या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री माही वीज, अनिता हसनंदानी तसचं गायक मिका सिंहनेदेखील कमेंट करत शिल्पाला पाठिंबा दिला आहे.

काय म्हणाली शिल्पा शेट्टी पोस्टमध्ये

“गेले काही दिवस आमच्यासाठी आव्हानात्मक होते. अनेक अफवा आणि आरोप केले जात आहेत. माध्यमांनी आणि काही लोकांनी माझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आले, प्रश्न विचारले गेले. मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि या प्रकरणात मी हे करणं टाळत राहणार आहे. कारण हे सगळं न्यायालयीन आहे, म्हणून माझं नाव घेऊन कोणतीही चुकीची विधान पसरवू नका.‘एक कलाकार म्हणून, कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार करू नका, कधीही कोणाला समजावून सांगू नका या तत्त्वाचं मी पालन करते. या सगळ्या प्रकरणात माझा मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते, विशेषत: एक आई म्हणून माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. सत्य जाणून घेतल्याशिवाय अर्धवट माहितीच्या आधारे टिप्पणी करू नका.,’असं शिल्पा शेट्टी तिच्या पोस्टमध्ये म्हणालीय.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After shilpa shetty statement bollywood celebities varun dhavan dia mirza jacqueline fernandez meezaan jafri supports shilpa kpw

ताज्या बातम्या