‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका ही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचे शूटिंग रद्द झाल्याने आता हे कलाकार घरीच बसले आहेत. क्वारंटाइन वेळेत प्रत्येकजण आपापले छंद जोपासत आहे. या मालिकेतील शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या काय करतेय हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

तेजश्री सध्या वाचनात व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या मोठ्या सुट्टीमध्ये ती अवांतर वाचन करतेय. सोशल मीडियापासून लांब राहून तेजश्री हा वेळ स्वतःसाठी देतेय. सोशल मीडियावर वेळ न दवडता तोच वेळ सत्कारणी लावायचं तेजश्रीने ठरवलंय आणि म्हणूनच ती पुस्तकांच्या प्रेमात रमली आहे. पुस्तकांच्या जवळ गेलेली तेजश्री सोशल मीडियापासून सध्या लांब असल्यामुळे तिचे चाहते मात्र तिला मिस करत आहेत.

आणखी वाचा : कधी सुनेसोबत लंगडी, कधी मुलासोबत दोरीवरच्या उड्या; मिलिंद सोमणची आई नेटकऱ्यांसाठी ठरतेय आदर्श 

दुसरीकडे मालिकेत सोहमची भूमिका साकारणारा अभिनेता सोहम घरी रोज नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सोहमने हॉटेलिंगचं शिक्षण घेतलंय. त्यामुळे आता क्वारंटाइन वेळेत त्याला त्याच्या आवडीचं काम करण्याची संधी मिळतेय.