scorecardresearch

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा ‘दृश्यम २’मध्ये दिसणार, अजय देवगणबरोबर करणार काम

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘दृश्यम २’ चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटामध्ये मराठमोळा कलाकार काम करताना दिसणार आहे.

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा ‘दृश्यम २’मध्ये दिसणार, अजय देवगणबरोबर करणार काम
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'दृश्यम २' चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटामध्ये मराठमोळा कलाकार काम करताना दिसणार आहे.

मराठी चित्रपट व मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत अभिनेता सिद्धार्थ बोडके नावारुपाला आला. झी मराठी वाहिनीवरील ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेमुळे तो प्रकाश झोतात आला. आता मराठीमधील हा प्रसिद्ध चेहरा बॉलिवूड चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटामध्ये सिद्धार्थ काम करताना दिसणार आहे. याबाबत त्याने स्वतःच माहिती दिली. सिद्धार्थने ‘दृश्यम २’बाबत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – दोन लग्न, चौथ्याच व्यक्तीशी अफेअर अन्…; बिपाशा बासूच्या नवऱ्याला पूर्वाश्रमीच्या पत्नीने मारली होती कानाखाली

अजय देवगणने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे रेस्तराँची बिलं, बसचं तिकीट आणि चित्रपटांची तिकिट याचे काही फोटो शेअर केले आहेत. यावर ३ ऑक्टोबर २०१४ अशी तारीख आहे. “काही जुनी बिलं आज हाती लागली.” असं अजयने पोस्ट शेअर करताना म्हटलं. सिद्धार्थनेही हिच बिलं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहेत.

‘दृश्यम २’चं पोस्टर शेअर करत त्याने म्हटलं की, “या चित्रपटाचा मी एक भाग आहे याचं मला खूप समाधान वाटतं.” त्याचबरोबरीने चित्रपट येत्या १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याचंही सिद्धार्थने सांगितलं आहे. आता सिद्धार्थची या चित्रपटामध्ये कोणती भूमिका असणार हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम’ क्राईम थ्रिलर चित्रपट होता. अजय व्यतिरिक्त तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव, रजत कपूर व ऋषभ चढ्ढा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता ‘दृश्यम २’मध्ये नक्की नवीन काय पाहायला मिळणार हे याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 10:14 IST

संबंधित बातम्या