Who is Zainab Ravdjee Nagarjuna’s daughter-in-law to be : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नागार्जुन यांचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनी याने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या होणार्‍या पत्नीबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत साखरपुड्याची घोषणा केली. लवकरच अखिल ( Akhil Akkineni ) झैनब रावदजी हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचा लग्नसोहळा पुढच्या वर्षी पार पडण्याची शक्यता आहे.

नागार्जुन यांनी एक्स पोस्ट शेअर करत मुलाचा साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या नव्या सुनेचं अक्किनेनी कुटुंबात स्वागत केलं होतं. अखिल हा अभिनेते नागार्जुन यांचा धाकटा मुलगा आहे. तसेच नागा चैतन्यचा तो सावत्र भाऊ आहे. २०१५ मध्ये त्याने सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. ‘हॅलो’, ‘मिस्टर मजनू’ आणि ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला होता.

हेही वाचा : रेश्मा शिंदे ‘या’ दिवशी करणार लग्न; मेहंदीमध्येच दडलीये लग्नाची तारीख, तुम्ही पाहिलीत का?

कोण आहे झैनब रावदजी?

अखिलची होणारी पत्नी ( Zainab Ravdjee ) नेमकी कोण आहे याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. तिच्याविषयी जाणून घेऊयात… झैनब सोशल मीडियावर सक्रिय नाही. ती एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातली आहे. तिचे वडील झुल्फी रावदजी हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. हैदराबादमध्ये जन्मलेल्या २७ वर्षीय झैनबचं मुंबईत घर आहे. याशिवाय एक प्रतिभावान चित्रकार म्हणून तिची ओळख आहे. चित्रकलेबरोबर, झैनबने अभिनय क्षेत्रातही काम केलं आहे. ती एमएफ हुसैन यांच्या ‘मीनाक्सी : ए टेल ऑफ थ्री सिटीज’मध्ये अभिनेत्री तब्बू आणि कुणाल कपूर यांच्यासह झळकली आहे.

झैनब एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे; तिचे वडील, झुल्फी रावदजी हे बांधकाम उद्योगातील अनुभवी व्यावसायिक आहेत, तर तिचे भाऊ, झैन रावदजी, ZR रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी सांभाळतात.

हेही वाचा : Actor Dashan : “तो समाजासाठी घातक होता, म्हणून त्याची हत्या केली”; अभिनेता दर्शनची उच्च न्यायालयात धक्कादायक माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता अखिल अक्किनेनी ( Akhil Akkineni ) आणि झैनब लग्न केव्हा करणार याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.