‘फॅमिली प्लॅनिंगचा विचार करत असाल तर ही स्टेप चुकीची करू नका’, अक्षय कुमारने दिली चेतावनी

अक्षयने व्हिडीओ शेअर करत ही चेतावनी दिली आहे.

akshay kumar, ranveer singh, aila re aillaa song,
अक्षयने व्हिडीओ शेअर करत ही चेतावनी दिली आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंगचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होण्यास काही दिवस आहेत. काल या चित्रपटातील पहिलं गाणं आयला रे आयला हे प्रदर्शित झालं. त्यानंतर अक्षय आणि रणवीरने एक बिहाइंड द सीन असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत डान्स स्टेप विषयी एक चेतावनी देखील दिली आहे.

अक्षयने आधी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर रणवीरने हा व्हिडीओ रीपोस्ट केला आहे. गाण्याच्या शूट आधीचा हा व्हिडीओ आहे. यात रणवीर आधी अक्षयला खेचत डान्स करायला घेऊन जातो. त्यानंतर ते दोघे ही आयला रे आयला या गाण्याच्या हूक स्टेप करत डान्स करतात.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

हा व्हिडीओ शेअर करत ‘इथे रणवीर आणि माझा आयला रे आयला गाण्यावरचा डान्स. मला तुमचा डान्स दाखवा.’ यासोबत अक्षयने चाहत्यांना एक चेतावनी देखील दिली आहे. ‘ही स्टेप चुकीची केली तर तुमच्या भविष्यातील फॅमिली प्लॅनिंगवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.’

आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे शाहरुख आजही विसरला नाही चंकी पांडेचे ‘ते’ उपकार

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता चित्रपटगृहे सुरु होणार असल्यामुळे चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar and ranveer singh gives warning 1 wrong step can be harmful for future planning watch the video dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या