scorecardresearch

“तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका, बहिष्कार कशाला?” अक्षय कुमारचा सवाल

अक्षय कुमारने चित्रपटांना विरोध करण्याच्या आणि बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडवर खुलेपणाने भाष्य केले आहे.

“तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका, बहिष्कार कशाला?” अक्षय कुमारचा सवाल
अक्षय कुमार आमिर खान

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार हा सध्या त्याच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटामुळे चागंलाच चर्चेत आहे. या चित्रपट येत्या ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. याच दिवशी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासोबत आलिया भट्टचा डार्लिंग्ज हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नेटकरी या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटांना विरोध करण्याच्या आणि बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडवर खुलेपणाने भाष्य केले आहे.

येत्या ११ ऑगस्टला अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ प्रदर्शित होत आहे. सध्या अक्षय या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अक्षयला हिंदी चित्रपटांना सातत्याने होणाऱ्या विरोधावर प्रश्न विचारण्यात आले. जर तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका, त्यावर बहिष्कार कशाला टाकता? असे त्याने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

कसा आहे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’? दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची पहिली प्रतिक्रिया

यापुढे तो म्हणाला, “तुम्हाला जर एखादा चित्रपट आवडत नसेल तर तुम्ही तो पाहू नका. सोशल मीडियावर फार कमी लोक आहेत, जे अशाप्रकारे खोडसाळपणा करताना दिसत आहेत. पण हरकत नाही. आपला देश एक स्वतंत्र देश आहे आणि आपल्या देशात प्रत्येकाला हवं ते करण्याची मुभा आहे. पण म्हणून अशाप्रकारच्या गोष्टी करण्यात काहीही अर्थ नाही.”

“गेल्या आठवड्यापासून सातत्याने अशाप्रकारच्या अफवा पसरत आहेत. पण या सर्व अफवा माझ्या मनोरंजनासाठी रोजच्या आहेत. मी हा चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आहे. तो पाहण्यासाठी मी अजून काही वेळ प्रतीक्षा करु शकत नाही. तसेच मी देखील या चित्रपटाचा एक भाग आहे”, असे शहनाजने म्हटले आहे.

“तीन महिन्यात नवीन चित्रपट…” ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर निलेश साबळेने उडवली अक्षय कुमारची खिल्ली

आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन या चित्रपटात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजीन कौर, स्मृती श्रीकांत आणि दीपिका खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजन प्रकारातील असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ, कलर यलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar comment on aamir khan laal singh chaddha alia bhatt darlings boycott trend on social media nrp

ताज्या बातम्या