बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचा 'पृथ्वीराज' (Prithviraj trailer) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत होते. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी अक्षयने खूप मेहनत घेतली. पण ट्रेलरच्या लॉन्च इव्हेंटमध्ये अक्षय भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. यामागच कारण अक्षय कुमारची आई आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अक्षय म्हणाला की, आज त्याच्या आईने त्याला पृथ्वीराज होताना पाहावे. ८ सप्टेंबर २०२१ रोजी अक्षयच्या आईचे निधन झाले. तर ८ मे म्हणजे काल मदर्स डेच्या निमित्ताने अक्षयने त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आज पृथ्वीराज चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी त्याला अश्रु अनावर झाले आणि तो म्हणाला, "हा एक शैक्षणिक चित्रपट आहे. प्रत्येकाने याविषयी जाणून घ्यायला हवे. या चित्रपटाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. माझी आई जर मला ही भूमिका साकारताना पाहू शकली असती असे मला वाटते. तिला खूप अभिमान झाला असता." आणखी वाचा : “थोडी तरी लाज बाळग…”, मुलगी आयरा खानच्या ‘त्या’ फोटोवरून आमिर खान झाला ट्रोल आणखी वाचा : सोनाक्षी सिन्हाने केला साखरपुडा? पोस्ट शेअर करत म्हणाली… अक्षयने पुढे म्हणाला की, "पृथ्वीराज चौहानांच्या भूमिकेत येण्यासाठी त्याने कोणत्या वेगळ्या गोष्टीचा अभ्यास केला नाही किंवा काही विसरण्याचा प्रयत्न केला नाही. दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे तो सगळ्या गोष्टी करत गेला. अक्षयने दिग्दर्शकाला फॉलो केले." आणखी वाचा : चित्रपटात मेकअप न करण्याऱ्या ‘या’ अभिनेत्रीने धुडकावले चक्क २ कोटींचे मानधन या चित्रपटात अक्षय कुमार हा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.