अभिनेता अक्षय कुमार त्याच्या वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध आहे. याच गुणामुळे त्याला सिनेसृष्टीमध्ये यश मिळाले आहे. तो बॉलिवूडमधल्या फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे एका वर्षात चारपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. २०२२ मध्ये त्याचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘कठपुतली’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काही महिन्यांनी त्याचा या वर्षातला पाचवा चित्रपट ‘राम सेतु’ प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या आगामी चित्रीपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

अक्षय दररोज पहाटे लवकर उठून व्यायाम करतो. त्यानंतर तो चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी सेटवरही वेळेवर पोहोचतो. या त्याच्या सवयीमुळे त्याला बिझी शेड्यूलमधून वेळ बाजूला काढता येतो. काम संपल्यानंतर तो सरळ घरी येतो. एका वर्षात इतके चित्रपट करुनही अक्षय त्याच्या कुटुंबाला वेळ देतो. काही दिवसांपूर्वी त्याचा एक काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो डोक्यावर मोठ्ठा टेडीबेअर घेऊन चालताना दिसत आहे. त्याच्यासह त्याची लेक नितारा आहे. त्यांच्या व्हिडीओवरुन अक्षयने निताराला अम्युझमेंट पार्कमध्ये फिरायला नेले होते असे लक्षात येते.

आणखी वाचा – “मला उलटी…” नेहा कक्करच्या ‘पायल है छनकाई’ रिमेकवर फाल्गुनी पाठकची पहिली प्रतिक्रिया

निताराचा आज दहावा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अक्षयने त्याचा एक गोड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्याने “माझा हात पकडण्यापासून ते स्वत:ची शॉपिंगची बॅग पकडण्यापर्यंतच्या प्रवासात माझी लाडकी लेक मोठी झाली आहे. आज तू दहा वर्षांची झाली आहेस. माझे आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत. बाबाकडून तुला खूप प्रेम.” असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे वाळवंटातल्या एका टेकडीवर चढाई करताना दिसत आहेत. त्याशिवाय त्याने निताराचा तिची शॉपिंगची बॅग उचलतानाचा फोटोही या व्हिडीओला जोडला आहे.

आणखी वाचा – ‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागात ‘जुनून’ हे पात्र दिसणार का? अभिनेत्री मौनी रॉयने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षात प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या ‘कठपुतली’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचे बाकीचे तिन्ही चित्रपट फ्लॉप झाले. सलग तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.