बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच अक्षयचा बच्चन पांडे हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देत असूनही पहिल्याच दिवशी चित्रपटाने १३. ५० कोटी रुपयांची कमाई केली. तर अक्षय सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या अक्षय समोरच्या व्यक्तीला मराठीतच बोलण्याचा आग्रह करताना दिसतो.

अक्षयचा हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षय गाडीत बसलेला दिसत आहे. यावेळी तो फोनवर एका महिलेशी बोलताना दिसतो. आपल्या आवडत्या कलाकाराशी थेट बोलता येत असल्याचा आनंद त्या महिलेच्या प्रत्येक वाक्यातून जाणवतं. सुरुवातीपासून महिला हिंदीमध्येच बोलत होती. यातच अक्षयला जेव्हा कळलं की ती महिला सोलापूरची आहे. तेव्हा त्याने स्वतःहून मराठीत बोलायला सुरुवात केली. “आपण मराठी आहात तर आपण मराठीतच बोलूया ना..” अशी विनंतीही तो त्या चाहतीला करताना दिसतो.

आणखी वाचा : The Kashmir Files: “मुस्लिमांना लाज वाटली पाहिजे…”, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले सत्य

आणखी वाचा : “चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दाखवताच…”, विवेक अग्निहोत्रींनी सांगितला शूटिंग थांबवल्याचा किस्सा

हा व्हिडीओ शेअर करत त्या नेटकऱ्याने एका अमराठी व्यक्तीकडून मराठी माणसाला मराठी आहात तर मराठी बोला सांगणे म्हणजे लज्जास्पद आहे. आपण मराठी म्हणून चुकतोय ना?का आपण मराठीवर ठाम राहत नाही? मराठी बोला, मराठी वाढवा, असे कॅप्शन दिले आहे. अक्षयचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे.

आणखी वाचा : ‘आई कुठे…’ फेम मधुराणीने अनोख्या पद्धतीने साजरा केला मुलीचा वाढदिवस, चाहते कौतुक करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. चित्रपटात एका पंडिताला जाणीवपूर्वक गुंड दाखवून धर्माची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनेकांनी केला. तर अक्षयसोबत या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन, जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसल्या आहेत.