‘अतरंगी रे’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, अक्षय, सारा, धनुषचा लूक पाहिलात का?

‘अतरंगी रे’ या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ चित्रपटांची घोषणा करताना दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अक्षय कुमारचे एकपाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. सूर्यवंशी आणि पृथ्वीराज या चित्रपटानंतर नुकतंच अक्षयने त्याच्या आणखी एक चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहेत. ‘अतरंगी रे’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून सध्या याचे पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे.

नुकतंच ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचे तीन टीझर पोस्टर समोर आले आहेत. या पोस्टरच्या माध्यामातून दिग्दर्शक आनंद एल राय यांनी आपल्या चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा बहुचर्चित आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्रामद्वारे चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

हेही वाचा : पुनीत राजकुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार? निर्माते संतोष म्हणाले…

यावेळी सारा अली खानने अक्षय कुमारचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. याला कॅप्शन देताना तिने लिहिले की, “प्रत्येकवेळी अतरंगी स्टाईलमध्ये एंट्री करतात. त्यांची ताकद आणि प्रेम बघून सर्वजण पराभूत होतात,” असे भन्नाट कॅप्शन तिने अक्षयचे पोस्टर शेअर करताना दिले आहे. तर अभिनेता धनुषचे पोस्टर शेअर करताना ती म्हणाली, “विशूला भेटा, हे चित्रपटातील आमचे पहिले पात्र आहे. जे इतर कोणी करू शकले नसते.”

त्यानंतर अक्षयने सारा अली खानचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “ही मुलगी प्रेमात वेडी झाली आहे. भेटा अतरंगी नंबर एक रिंकूला,” असे तिने म्हटले.

हेही वाचा : एअर हॉस्टेसचा ड्रेस मागून घेतलास का?; करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे रणवीर सिंग ट्रोल

‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar sara ali khan and dhanush atrangi re first looks motion posters unveiled nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या