अभिनेत्री आलिया भट्टने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आलिया बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. आलियाने आतापर्यंत एकापेक्षा एक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून आलियाचा हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यात आलिया भट्ट अॅक्शन अवतारात पाहायला मिळत आहे.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड डेब्यू चित्रपटातील फर्स्ट लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्रथम एक दुचाकी वेगाने जाताना दिसत आहे. यानंतर गल गॅडोट फाइट करताना दिसत आहे आणि त्यानंतर या व्हिडीओमध्ये आलियाची झलकही दाखवण्यात आली आहे. त्यानंतर कलाकारांची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळते. व्हिडीओमध्ये कलाकारांच्या फर्स्ट लुकसह बिहाइंड द सीनही दाखवण्यात आले आहेत. याशिवाय कलाकार त्यांचे अनुभव शेअर करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- “चित्रपट चालणार की नाही हे मला…” ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर आलिया भट्टचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

आलियाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, ‘हार्ट ऑफ स्टोन आणि कियाचा फर्स्ट लूक. 2023 मध्ये Netflix वर येत आहे.’ आलियाच्या या पोस्टवर तिची आई सोनी राझदानने कमेंट केली, ‘ओह फॅब! हे खूप रोमांचक आहे!’ तर अर्जुन कपूरने लिहिले, ‘ही खूप मोठी गोष्ट आहे… अभिमानास्पद.’ याशिवाय चाहत्यांनीही ‘व्वा’, ‘अद्भुत’ आणि ‘खूपच उत्सुक आहोत’ अशा कमेंट करत या टीझरवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा- रश्मिकासह गोविंदा यांचा ‘सामी सामी’ गाण्यावर धम्माल डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या चित्रपटात आलिया भट्टची खास भूमिका असणार आहे. या चित्रपटात ती किया धवन ही भारतीय व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. याच व्हिडीओमध्ये ती आपला अनुभव सांगताना दिसत आहे. ती म्हणते, “या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेशी तुम्ही जोडले जाता. ती तुम्हाला आपली असल्यासारखी वाटते.” या चित्रपटाचं दिग्दर्शन टॉम हार्परने केलं असून यात सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर, जिंग लुसी आणि पॉल रेडी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.