आलिया भट्ट लवकरच हॉलिवूड सिनेमा ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून झळकणार आहे. याच सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया काही दिवसांपासून परदेशात होती. मात्र नुकतच तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय. काही फोटो शेअर करत आलियाने तिच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे.
आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड सिनेमात वंडर वुमन गल गडोट आणि अभिनेता जेमी डोर्ननसोबत झळकणार आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आलियाने सेटवरील काही फोटो शेअर करत टीमचे आभार मानले आहेत. आलियाने अभिनेत्री गल गडोतसोबत एक फोटो शेअर केलाय. ज्यात तिने गल गडोटला मिठी मारल्याचं पाहायला मिळतंय.
“तुला पर्सनल मेसेज करण्यासाठी मला…”; आलिया भट्टने शेअर केला इब्राहिम अली खानचा ‘तो’ मेसेज
या फोटोंसोबतच तिने एक खास कॅप्शनही दिलंय. यात तिने ‘हार्ट ऑऱ स्टोन’ सिनेमासाठी तिचं प्रेम व्यक्त केलंय.तर अभिनेत्री गल गडोत आणि दिग्दर्शन टॉम हार्परचे आभार मानले आहेत. दरम्यान जेमी डोर्ननला मिस केल्याचं ती म्हणालीय. तसचं तिने संपूर्ण टीमने तिची काळजी घेतल्याबद्दल सगळ्यांचेच आभार मानले आहेत.
आलियाने ती भारतात परतत असल्याचंही तिच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. “आता मात्र मी घरी येतेय बेबी” असं तिने शेवटी म्हंटलंय. तर आलियाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. “आम्ही तर तुला आताच मिस करू लागलो आहे” अशी कमेंट गल गडोतने केली आहे. तसचं गल गडोतनेही तिच्या इन्स्टास्टोरीवर आलियासोबतचा एक फोटो शेअर केलाय.
महेश भट्ट यांना लेक आलियाच्या लग्नात आला होता राग? करण जोहरने केला खुलासा
‘हार्ट ऑफ स्टोन’ हा सिनेमा एक स्पाय थ्रिलर सिनेमा आहे. मे महिन्यातच आलियाने या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली होती. तर गेल्या महिन्यातच आलियाने ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यामुळे आता चाहते आलिया भारतात परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.