अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी आलिया तिच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. अशात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं अजय देवगण, शाहरुख खान, संजय दत्त यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला. यासोबतच या मुलाखतीत आलियानं एक असं वक्तव्य केलं ज्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

आलियानं ‘डियर जिंदगी’ आणि ‘सडक २’मध्ये शाहरुख खान आणि संजय दत्त यांच्यासोबत काम केल्यानंतर आता लवकरच अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अशात आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलखतीत आलियानं बॉलिवूड इंडस्ट्री क्रुर असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, ‘ही इंडस्ट्री खूप क्रुर आहे. जोपर्यंत तुम्ही इथे तुमचे १०० टक्के प्रयत्न करत नाही तोपर्यंत इथे टिकून राहणं तुम्हाला शक्य नाही. तुम्ही असं नाही केलं तर ६ महिने किंवा एका वर्षातच तुम्ही इथून गायब होता. इथे आल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी डावावर लावव्या लागतात. त्यानंतर कुठे तुम्हाला या ठिकाणी स्वतःची जागा निर्माण करता येते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुपरस्टार्ससोबत काम करण्याच्या प्रश्नावर आलिया म्हणाली, ‘जेव्हा मी सुपरस्टार्सना पाहिलं तेव्हा ते खूपच सामान्य वाटले. त्यांनी कुठेही त्याचा मोठेपणा केला नाही. त्यांना मी नेहमीच सामान्य माणसांप्रमाणे वागताना पाहिलं आहे. ते सेटवर येतात, काम करतात आणि घरी जातात. प्रेक्षकांसाठी जरी ते स्टार्स असले तरी सेटवर ते त्यांचं काम करत असतात.’