अभिनेत्री आलिया भट्टने यावेळी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण केले आहे. बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपली छाप पाडत आहे. ‘कान्स’च्या पहिल्या दिवशी आलिया रिया कपूरने स्टाईल केलेल्या गाऊनमध्ये दिसली. तिच्या लूकची खूप प्रशंसा झाली; पण तिने तिच्या दुसऱ्या लूकने तर सर्वांना आश्चर्यचकित केले.

दुसऱ्या दिवशी आलिया भट्टने गुचीने बनवलेली क्रिस्टल साडी घातली होती, ज्यामध्ये कोणतेही फॅब्रिक नव्हते. या कार्यक्रमातील अभिनेत्रीचा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आता आलिया रेड कार्पेटवर गुचीने डिझाइन केलेल्या पहिल्या साडीत इतिहास रचताना दिसली.

आलिया भट्टने साडीपासून प्रेरित गुचीचा ड्रेस घातला होता

आलिया भट्टच्या साडीत स्वारोवस्की क्रिस्टल्स होते, ज्यावर अभिनेत्रीने मॅचिंग नेकलेस व कर्णफुले घातली होती आणि केस मोकळे ठेवले होते. आलिया रेड कार्पेटवर पोहोचताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रिया कपूरने तिला स्टाईल केले होते, ज्यासाठी आलियाचे आता खूप कौतुक होत आहे.

हलकी कर्णफुले आणि नेकलेससह, आलिया भट्टचा आउटफिट तिच्या दागिन्यांपेक्षा जास्त अधोरेखित झाला. ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील आलिया भट्टच्या या लूकचे फोटो व्हायरल झाले आणि चाहते त्याबद्दल त्यांची मते स्पष्टपणे देताना दिसले.

आलियाच्या लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

या क्रिस्टल साडीत आलिया भट्ट खूपच सुंदर व क्लासी दिसत होती. अनेक वापरकर्ते प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीच्या लूकचे कौतुकही करीत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “आम्हाला हेच हवे होते. शाब्बास आलिया.” दुसऱ्याने लिहिले, ‘मी पहिल्यांदाच म्हणू शकतो की, ती खूपच सुंदर दिसते.” तिसऱ्याने लिहिले, “आलिया भट्ट ही गुचीची ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे आणि त्या ब्रँडने डिझाइन केलेली पहिली साडी नेसली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, आलिया भट्ट शेवटची ‘जिगरा’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर प्रेक्षक आता तिच्या पुढील प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. आलिया भट्टचा पुढचा चित्रपट ‘अल्फा’ असेल, जो या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय ती ‘लव्ह अँड वॉर’मध्ये महिला मुख्य भूमिकेतही दिसणार आहे.