दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट तुफान गाजला आणि अल्लू अर्जुन फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्येच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय ठरला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा रावडी अंदाज सर्वांच्याच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटाच्या संवादांची प्रेक्षकांना एवढी भूरळ घातली होती की आजही अनेकांच्या तोंडी हे संवाद ऐकायला मिळातात. पुष्पाच्या प्रचंड यशानंतर आता निर्मात्यांनी पुढील भागाची घोषणा केली आहे
.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. भारताचा अपेक्षित पुष्पा द रुल मुहूर्त (पूजा ) उद्या, अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे. २२ ऑगस्ट रोजी निर्मात्यांनी पुढील चित्रीकरणाला सुरवात करणार आहेत . २२ ऑगस्ट चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल त्याआधी पूजा संपन्न होणार आहे. पहिल्या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदना मुख्य भूमिकेत दिसले होते. मध्यंतरी दुसऱ्या भागात श्रीवल्लीचा मृत्यू होणार अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. आता यावर निर्मात्यांनी एका मुलाखतीत मौन सोडत दुसऱ्या भागात असं काहीच होणार नसल्याचं म्हटलं होते.

हिंदीमध्ये काम करणं…” बॉलिवूड चित्रपटांबद्दल अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया चर्चेत

२९ जुलै रोजी अल्लू अर्जुनने तोंडात सिगारेट ठेवल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्याच्या चाहत्यांनी अंदाज बांधला की हा लूक पुढील भागासाठी असावा. मात्र इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार पुढील भागामध्ये केवळ एक नव्हे तर दोन लूक अल्लू अर्जुनचे असणार आहेत. पहिल्या भागाच्या अखेरीस त्याचं आणि श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाचं लग्न झालेलं दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यात तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरवात होईल, नव्या भागात जास्त ऍक्शन आणि मसाला पाहायला मिळणार हे नक्की प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली. पुष्पाचे चाहते आता प्रदर्शनाच्या तारखेची वाट बघत आहेत.