अभिनेता अल्लू अर्जुन म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. सध्या तो त्याच्या आगामी ‘पुष्पा-२ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने त्याला एक वेगळी ओळख दिली. तर त्याचबरोबर त्याचा चाहतावर्गदेखील खूप वाढला. आज जगभरात त्याचे करोडो फॅन्स आहेत. तर आज प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या ‘पुष्पा’चा म्हणजेच अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे.

गेली अनेक वर्षे विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनोरंजनसृष्टीत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेच पण त्याचबरोबर त्याने मोठी संपत्तीही कमावली. आज तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे.

आणखी वाचा : Pushpa 2 Teaser: दंगली, जाळपोळ, पुष्पाचा शोध अन्…; ‘पुष्पा २’चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी १२ ते १३ कोटी मानधन घेतो. तर ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने त्याच्या मानधनात मोठीच वाढ केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो सेव्हन अप, थम्सअप, एअरटेल, टाटा स्काय, डाबर आमला हेअर ऑईल आणि मिरिंडा यांसारख्या बड्या ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्येही दिसतो. या जाहिराती करण्यासाठीही तो कोट्यवधी रुपये आकारतो.

हेही वाचा : शाहरुख आणि सलमानच्या आगामी चित्रपटांना मागे टाकत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ने रचला नवा विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हैदराबादमध्ये त्याचे स्वतःचे आलिशान घर आहे. या घराची किंमत १०० कोटी असल्याचे बोलले जाते. त्याला गाड्यांचेही वेड आहे. त्याचे कार कलेक्शन खूप मोठे आहे. त्याच्या या कलेक्शनमध्ये वॉल्वो एक्ससी ९० टी८, मर्सिडिज बेंझ गीएलई ३५० डी, हमर एच२, रेंज रोवर अशा महागड्या गाड्या आहेत. इतकेच नाही तर त्याची स्वतःची व्हॅनिटी व्हॅनही आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ७ कोटी आहे. सेलिब्रेटी नेटवर्थच्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ३५० कोटींहून अधिक आहे.