दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलिज केला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आता हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘कन्फर्म! पुष्मा हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज होणारा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाती पात्र आणि कथा पूर्ण करण्यासाठी आणि रंगवण्यासाठी आणखी कालावधीची गरज असल्याने हा चित्रपट दोन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज करणार असल्याचे, निर्माते नवीन येर्नेनी यांनी सांगितले होते. आता चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.