Pushpa 2: The Rule Box Office Collection Day 61 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी जागतिक स्तरावर २८० कोटी कमाई केली होतील. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. येत्या ५ फेब्रुवारीला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाला दोन महिने पूर्ण होती. आता या सुपरहिट चित्रपटाला ६१ दिवस पूर्ण झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी ३० जानेवारीला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाला. त्यामुळे आता घरबसल्या प्रेक्षक या सुपरहिट चित्रपट पाहत आहेत. पण याचा मोठा परिणाम बॉक्स ऑफिसच्या कमाईवर झाल्याचं दिसत आहे.

ओटीटी प्रदर्शनानंतर कोट्यावधींची कमाई करणाऱ्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ५ लाखांचादेखील गल्ला जमवता येत नाहीये. सॅकनिल्कच्या वेबसाइटनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने ६१व्या दिवशी भारतात फक्त ३ लाखांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १२३३.६५ कोटींचा व्यवसाय केला आहे. ५८व्या दिवशी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने भारतात १० लाखांची कमाई केली होती. त्यानंतर कमाईत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.

६१व्या दिवसाच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी ७.३५ टक्के हिंदी व्हर्जनने कमावले आहेत. ‘पुष्पा २: द रुल’च्या हिंदी व्हर्जनला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तसंच जगभरातही ‘पुष्पा २: द रुल’च्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आजकाल चित्रपट प्रदर्शनानंतर काही आठवड्यात बॉक्स ऑफिसवरून गायब होतात. पण ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या बाबतीत असं अजिबात झालं नाही. ओटीटी प्रदर्शित होऊन चित्रपटाला थोड्या फार प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ४०० ते ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त फहाद फासिल, श्रीतेज, अनासुया भारद्वाज, जगदीप प्रताप, जगपति बाबू महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.