४ डिसेंबर रोजी आयकॉनिक संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ या चित्रपटाचे प्रिमियर ठेवण्यात आले होते. या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत झाली. या घटनेत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज जखमी झाला होता. चेंगराचेंगरीच्या घटनेवेळी अल्लू अर्जुन तिथे उपस्थित होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर १३ डिसेंबर रोजी पोलिसांनी अभिनेत्याला अटकही केली होती. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. आता या प्रकरणातील पुढील सुनावणीत अल्लू अर्जुन प्रत्यक्ष हजर राहणार नाही.

१३ डिसेंबरला पोलिसांनी अटक केल्यावर नामपल्ली न्यायालयाने अभिनेत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच दिवशी त्याला तेलंगणा हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात एक रात्र घालवल्यानंतर त्याला १४ डिसेंबर रोजी सोडण्यात आलं होतं.

हेही वाचा – “कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”

आज २७ डिसेंबर रोजी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने अभिनेत्याला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहावे लागणार होतं. अल्लू अर्जुनचे वकील निरंजन रेड्डी आणि अशोक रेड्डी यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्याच्या सुनावणीत वकिलांनी त्याला व्हर्च्युअल हजेरी लावण्यासाठी परवानगी देण्याची मागणी कोर्टात केली. कारण तो प्रत्यक्ष हजर राहिल्यास न्यायालयाच्या परिसरात गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊ शकते. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी कोर्टाने परवानगी दिल्यावर अल्लू अर्जुन शुक्रवारी नामपल्ली कोर्टात व्हर्चुअली हजर राहिला.

हेही वाचा – अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”

दरम्यान, १४ डिसेंबरला तुरुंगातून सुटल्यावर १० दिवसांनी पोलिसांनी अल्लू अर्जुनला २४ डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तयार केलेल्या १० मिनिटांच्या व्हिडिओच्या आधारे चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात त्याची तीन तास चौकशी करण्यात आली.

“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२१ डिसेंबर रोजी विधानसभेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनवर पोलिसांच्या परवानगीशिवाय थिएटरला भेट देण्याचा आणि थिएटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ‘रोड शो’ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनने पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आणि कोणताही रोड शो केला नव्हता, असं म्हणलं होतं.